β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयाचा खेळाडू उन्मेश वाघ राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सहभाग -( प्रतिनिधी : संजय परमसागर)
β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयाचा खेळाडू उन्मेश वाघ राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सहभाग -( प्रतिनिधी : संजय परमसागर)
बिटको महाविद्यालयाचा खेळाडू उन्मेश वाघ राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सहभाग
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.18 डिसेंबर 2023
β⇔ नाशिकरोड, ता 18 ( प्रतिनिधी : संजय परमसागर) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी सायन्सचा विद्यार्थी उन्मेश राहुल वाघ याने जम्मू काश्मीर येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या ६७ व्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध जम्मू काश्मीर, दिल्ली , ओडीसा संघासोबत मॅच पार पडली. अखेरची मॅच महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा अशी मॅच होऊन बरोबरीत टाय झाली. त्याने घेतलेल्या सहभागाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. के. सी. टकले , उपप्राचार्य सौ सुनीता नेमाडे, डॉ. आकाश ठाकूर यांनी अभिनंदन केले. त्याला क्रीडाशिक्षक महेश थेटे यांचे मार्गदर्शन लाभले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०