





विकास गुरव यांना ”राष्ट्रनिर्माता पुरस्कार” प्रदान

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 18 डिसेंबर, 2023
β⇔सांगली, ता.18 ( प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):- सांगली जिल्ह्यातील येळावी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद शाळा, हणमंतपूर (तुरची),ता. तासगाव या शाळेचे मुख्याध्यापक श्री. विकास रामचंद्र गुरव (सेवा २२ वर्ष) यांना इनरव्हील क्लब ऑफ सांगली मिडटाऊन सनराईज यांचे वतीने राष्ट्रनिर्माता पुरस्कार (Nation Builder Award) देवून सन्मानित करणेत आले. सध्याची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हणमंतपूर( तुरची ) ता. तासगाव , जिल्हा- सांगली येथे कार्यरत आहेत.

श्री. विकास रामचंद्र गुरव यांनी शैक्षणिक पात्रता त्यांनी एच.एस.सी., डी.एड., एम. ए., बी. एड., एम. ए., इतिहास, राज्यशास्त्र, शास्त्रशिक्षण आदिसह गुणवत्ता वाढवून शैक्षणिक क्षेत्रात उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. त्यांची सामाजिक कार्य,शैक्षणिक कार्य प्रामाणिकपणे निष्ठेने पूर्ण केली आहेत.यामध्ये शैक्षणिक साहित्य निर्मितीत यश, विविध प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शन, सामाजिक कार्याबद्दल आवड, विविध स्पर्धा परीक्षामध्ये त्यांचे विद्यार्थी यशस्वी तसेच नव नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनवणे हा त्यांचा सदैव प्रयत्न असून शासकीय योजनेचा मुलांना लाभ देण्यासाठी नेहमी पुढाकार आहेत म्हणून त्यांना तालुका स्तरावरील गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यासह जिल्ह्यातून अधिकारी वर्ग, मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०