β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 30 ऑगस्ट 2024
β⇔ नाशिकरोड, 30(प्रतिनिधी : संजय परमसागर) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कनिष्ठ बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे सर, विज्ञान विभागाचे समन्व्यक डॉ. के. सी. टकले सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक महेश थेटे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी बद्दल माहिती सांगून खेळाडू विद्यार्थ्यांनी करिअर कसे घडवावे याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी गुणवंत खेळाडूंचा सत्कारही केला गेला व विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक धनंजय बर्वे यांनी मानले . याप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमीशेअर व लाईक कराआणिसबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेसकरा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)