β : नाशिक :⇔” माझी ३९ वर्षाची तपस्या महाविद्यालयाच्या प्रगतीतून फळाला आली, हे माझे भाग्यच आहे” – प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे – ( प्रतिनिधी : छाया लोखंडे – गिरी )
β : नाशिक :⇔" माझी ३९ वर्षाची तपस्या महाविद्यालयाच्या प्रगतीतून फळाला आली, हे माझे भाग्यच आहे" - प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे - ( प्रतिनिधी : छाया लोखंडे - गिरी )
” माझी ३९ वर्षाची तपस्या महाविद्यालयाच्या प्रगतीतून फळाला आली, हे माझे भाग्यच आहे” – प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.19 ऑक्टोबर 2023
β⇔नाशिक, ता 19 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे – गिरी ) :- गोखले शिक्षण संस्थेच्या एस.एम. आर.के . महिला महाविद्यालयात आज संस्थेच्या सचिव व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व प्रमुख अतिथी डी. के गोसावी, संस्थेचे प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खनिनदार व विशस्त डॉ. आर.पी. देशपांडे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सौ. नीलम बोकिल ह्यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मान्यवरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. नौपचारिक आणि आत्मीयतेने भरलेल्या वातावरणात महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर कासार ह्यांची संगीत मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. बॅचलर ऑफ व्हिजुअल आर्ट विभागाने प्राचार्यांना त्यांचे चित्र भेट दिले. महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या डॉ. मोहिनी पेटकर ह्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेल्या प्राचार्या मॅडमचे अभिष्ट चिंतीले. प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांची कन्या सौ. नेहा शब्दे व श्रेया नारके ह्यांनी आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चिरंजीव अक्षय देशपांडे, शैलेश गोसावी ,कल्पेश गोसावी हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. संस्थेचे प्रकल्प संचालक व डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांचे पती प्रदीप देशपांडे हयांनी डॉ. सौ.दीप्ती देशपांडे ह्यांच्या कार्याबद्दल , कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले. संस्थेच्या नाशिक विभागाचे सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी मुंबई विभागाच्या सचिव प्राचार्या डॉ. सौ. सुहासिनी संत ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
निवृत्त प्राध्यापकांच्या वतीने डॉ. मोहिनी पेटकर ,उपप्राचार्या डॉ. सौ. कविता पाटील , डॉ. वृंदा भार्गवे, डॉ अनिल सरोदे ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांच्या पीएच. डी.च्या विद्यार्थिनी डॉ. सुनिता पिंपळे, डॉ. लीना गो-हे ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविद्यालयातील प्राध्यापक यशवंत केळकर, प्रा सविता बोरसे, प्रा प्रज्ञा अभ्यंकर, शोभा त्रिभुवन. मैथिली लाखे, छाया लोखंडे , प्रा. संजय पाबारी , प्रा. डॉ. अविराज तायडे , प्रा डॉ. नितीन सोनगिरकर, प्रा डॉ. महेंद्र धोडंगे पाटील, नितीन वारे, प्रशांत आंबेकर , कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर.पी. देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांच्या हातून अजून मोठे काम होईल असा विश्वास व्यक्त केला.
प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की , सत्काराला उत्तर देताना डॉ. सौ दीप्ती देशपांडे ह्यांनी इतक्या सुंदर भावपूर्ण सोहळ्याच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्या आई- वडिलांच्या शिकवणुकीचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे, असे त्या म्हणाल्या. आपल्या कार्यकाळातील आनंदाच्या क्षणांना त्यांनी उजाळा दिला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ अश्लेषा कुलकर्णी व सौ. रसिका सप्रे यांनी केले तर आभार उपप्राचार्या डॉ . कविता पाटील यांनी मानले .
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो : ८२०८१८०५१०