





मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला; धाराशिव युवकांचे तळ्यात जल आंदोलन, उपविभागीय कार्यालय पेटवून देण्याचा इशारा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 23 जून 2024
β⇔,येडशी (धाराशिव) दि.23 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा काल तिसरा दिवस त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत धाराशिव मधील काही युवक हे हातलाई परिसरात असलेल्या तळ्यात जल आंदोलन करण्यासाठी सकाळी दहा वाजता उतरले. प्रशासनाच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली असतानाही दुपारी तीन वाजेपर्यंत जबाबदार अधिकारी याने आंदोलन ठिकाणी जाण्याचे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.
आंदोलन ठिकाणी हजर असलेल्या इतर मराठा बांधवांनी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी साहेबाना फोन करून सदरील घटना सांगितली असता त्यांनी तात्काळ तहसीलदार मॅडम आणि उपविभागीय मॅडम यांना घटना स्थळी जाऊन आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या मागण्यांचा विचार करावा असे सांगितले. मात्र एकही अधिकारी त्या ठिकाणी आला नाही आणि त्यातच एकजण पाण्यात चक्कर येऊन पडला आणि बुडत असताना तेथील बांधवांनी त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आंदोलनालकांनी विभागीय कार्यालयात तोडफोड सुरू केली आणि कार्यालय पेटवून देण्याचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि घटना स्थळी तहसीलदार,उप विभागीय अधिकारी, तसेच निवासी जिल्हाधिकारी यांनी धाव घेतली. तेथे एक तास फक्त बघ्याची भूमिका अधिकारी घेतली, संध्याकाळचे पाच वाजून गेले तरीही ठोस पावले उचलली जात नाहीत, हे लक्षात येताच मनोज जाधव यांनी काही साथीदारांना आपल्या सोबत घेऊन बार्शी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आणि हा रास्ता रोको संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवला त्यामुळे जवळपास तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली.
आंदोलक हे आत्ता आक्रमक होत आहेत आणि हे आंदोलन उग्र रूप धारण करत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली आणि आंदोलकांची जी मागणी होती. ती तात्काळ मान्य करून त्यांना तसं लेखी पत्र देऊन आंदोलन थांबविले आणि सर्व आंदोलकांना पुढील उपचारासाठी शहरातील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. आंदोलनाचे यश काळात आंदोलकांवर नोंद असलेले सर्व गुन्हे 5 लाख रुपये नुकसानीच्या आतील तात्काळ मागे घेण्याचे लेखी पत्र दिले. जात वैधता प्रमाणपत्र करणारे पवार नावाचे मस्त्वाल अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याचे राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र जिल्हाधिकारी साहेबांनी फोन वरून विनंती करून तसे पत्र आंदोलकांना दिले. एकच मिशन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण आत्ता माघार नाही. एक मराठा कोटी मराठा
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)
©सदर लेखाबाबत संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. सदर मत सर्वस्वी लेखकाचे असून त्यांचीच जबाबदारी आहे,