





सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा मोरे ‘दूरदृष्टी असलेले समाजसुधारक’-
प्राचार्य डॉ.रवींद्रकुमार पाटील
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक : मंगळवार : दि 19 सप्टेंबर 2023
β⇒ नाशिक , ता. 19 ( प्रतिनिधी : आनंदा जाधव ) :- महात्मा फुले यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि राजर्षी छ्त्रपती शाहू महाराजांनी चालना देत या विचारांचा वारसा पुढे नेऊन बहुजन समाजाने शिक्षित व्हावे,समाजातील विषमता दूर व्हावी, यासाठी कर्मवीर गणपतदादा मोरे यांनी जलशांच्या माध्यमातून बहुजन समाज जागृतीचा प्रयत्न जोमात केला. शिक्षणासंबंधी बहुजन समाजाच्या मुलांनी जागृत व्हावे, ही खरी गणपतदादा यांच्या कार्याची दिशा होती.शिक्षणवीना समाजाची प्रगती शक्य नाही, हे अचुक सत्य त्यांनी हेरले. समाजातील सनातनरुढी, अज्ञान व अंधश्रध्देचा अंधकार दूर करण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले. त्यात अग्रकमाने नामोल्लेख होतो. तो सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा मोरे यांचा सत्यशोधक समाजाचा विचार जनमानसात रूजविण्याबरोबरच बहुजन समाजाला शिक्षणांची दारे खुली करून देण्याचे मविप्र संस्थेच्या माध्यमातून अतिशय मोल्यवान कार्य यांनी केले. त्याचे हे सामाजिक कार्य नवीन पिढीस आदर्शवत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.रवींद्रकुमार पाटील यांनी कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मविप्र वाणिज्य,व्यवस्थापन व संगणकशास्त्र महाविद्यालयात शिक्षणाधिकारी डॉ.अजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले की, प्रतिकूल परिस्थीतीत अन्यायाच्या विरोधात बहुजन समाजासाठी लढलेल्या या कर्मवीरांचे योगदान आपण विसरता कामा नये. त्यांचे विचार आपाल्याला जपायला हवेत. त्यासाठी आपण कर्मवीरांचे विचार नवीन पिढीमध्ये रुजविण्याचे कार्य करून समाजाप्रतीचे दायित्व पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. हिरामण भोये, प्रा.ज्योती खताळे यांनी कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या जीवनकार्याची सखोल माहीती देत मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर आयक्युएसी समन्वयक प्रा.अमित मोगल कार्यालयीन अधिक्षक अरविंद आवारे, प्रा.स्वप्नील साखला, प्रा.हरिषचंद्र खांडबहाले होते. प्रा.विभावरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संगणक विभाग प्रमुख डॉ.मधुकर शेलार यांनी आभार मानले.सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर वर्ग यावेळी उपस्थित होता.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
