Breaking
ई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

β : सुरगाणा (शहर ):⇔उंबरठाण वनपरिक्षेत्रात्त धुकट्या डोंगराला आगीने पसरला वणवा, जैवविविधता धोक्यात !-(प्रतिनिधी : रतन चौधरी )     

β : सुरगाणा (शहर ):⇔उंबरठाण वनपरिक्षेत्रात्त धुकट्या डोंगराला आगीने पसरला वणवा, जैवविविधता धोक्यात !-(प्रतिनिधी : रतन चौधरी )     

0 0 2 5 6 1

 उंबरठाण वनपरिक्षेत्रात्त धुकट्या डोंगराला आगीने पसरला वणवा, जैवविविधता धोक्यात !    

 

β : सुरगाणा (शहर ):⇔उंबरठाण वनपरिक्षेत्रात्त धुकट्या डोंगराला आगीने पसरला वणवा, जैवविविधता धोक्यात !-(प्रतिनिधी : रतन चौधरी )     
β : सुरगाणा (शहर ):⇔उंबरठाण वनपरिक्षेत्रात्त धुकट्या डोंगराला आगीने पसरला वणवा, जैवविविधता धोक्यात !-(प्रतिनिधी : रतन चौधरी )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 17 मार्च  2024

β⇔  सुरगाणा (शहर ), दि.17 (प्रतिनिधी : रतन चौधरी ):- सुरगाणा तालुक्यात धुकट्या डोंगराला आग लागून वणवा  पसरला असून जैवविविधता धोक्यात आली आहे. आगीने हजारो वन्य जीवांची राखरांगोळी झाली असून वन्यजीव आगीच्या भक्षस्थानी पडण्याची भीती आहे.  सुरगाणा तालुक्यात अपरिमित वृक्षतोडीमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे, तर दुसरीकडे वणव्यांनी सुरगाणा  तालुक्यातील  नागरिकांची चिंता वाढवली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील केम पर्वत, डोंगर रांगेतील करंजुल(क), बर्डा,चिंचमाळ, गावाजवळील वनपरिक्षेत्र उंबरठाण या अंतर्गत धुकट्या डोंगर रांगेतील मडाचा दरा, ढेप डोंगर, डोल्हारी डोंगर या भागात सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. तिव्र उन्हाच्या झळा असल्याने झाडांच्या फांद्या, अथवा बांबू एकमेकांशी घर्षणाने आक्समिक पणे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. उंबरठाण वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांना ग्रामस्थांनी पाच वाजेच्या दरम्यान संपर्क केला असता त्यांनी तात्काळ याची दखल घेत वन मजूर, वनपाल यांना आदेश देत घटनास्थळी पाठवले आहे.

             सदर धुकट्या डोंगरावर  अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजिना असून ससे, बिबट्या, मोर, रानडुक्कर, माकडे, रानमांजर, खवले मांजर, सायंदर ( शहाळ), घोरपड, अजगर, नाग आदी वन्यजीवांचा अधिवास आहे. आगीमुळे या वन्यजीवांचे अस्तित्वात धोक्यात आले आहे. वनौषधी म्हणून वापरात असलेले गवती चहा’ रोयचा’ गवत जळून खाक झाले आहे. या आगीमुळे धुकट्या पर्वतावरील जैवविविधता धोक्यात आली आहे. मात्र या आगीला कारणीभूत नेमका कोण ? हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाचे ग्रामीण भागातील निवासस्थान व टेहळणी केंद्र जिर्ण अवस्थेत असून ओस पडले आहेत. वन कर्मचारी,अधिकारी यांनी देखील या ठिकाणी चोखपणे लक्ष देणे आवश्यक आहे. या वन कर्मचारी यांना पायातील बुट, पाण्याची बाटली, अग्निशमन दला सारखा अग्नी रोधक पोशाख पुरविणे आवश्यक आहे. काही गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समित्या फक्त नावालाच उरल्या असल्याचे दिसून येत आहे. पुर्वी वनविभागाच्या जंगलावर निगराणी ठेवण्यासाठी विभागावर वन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत होती. त्यांचे लक्ष वनांवर चौफेर असायचे. त्यामुळे वन जमिनीवर अतिक्रमण व वृक्षतोड नियंत्रणात असायची. धुकट्या डोंगराला लागलेली आग तात्काळ विझविण्याची मागणी वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे.

     धुकट्या डोंगराला लागलेली आग-

धुकट्या डोंगराला लागलेली आग ही नियतक्षेत्र करंजुल(क) मध्ये कक्ष क्र-१८ मध्ये ढेपडोंगराला लागलेला वणवा हा मानवनिर्मित असल्याची शंका असुन सदर वणवा संध्याकाळी ६:३० ते ७ वाजेच्या दरम्यान लागला असुन उंबरठाण वन विभागाला माहिती मिळताच सर्व १७ ते १८ वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना होऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत, वणवा आटोक्यात आला असुन केवळ डोंगराच्या ज्या भागात पोहचणे अवघड आहे तेवढ्याच भागात तो मर्यादित आहे वनविभागाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत असुन लवकरच वणव्यावर नियंत्रण येईल.गणेश माळीवनपरिक्षेत्र अधिकारी उंबरठाण सुरगाणा.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 1

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!