





शिक्षक परिषद बागलाण तालुका सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद, जागतिक महिला दिनानिमित्त महिला आघाडीचा सत्कार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 8 मार्च 2024
β⇔दिंडोरी, दि.8 (प्रतिनिधी:रावसाहेब जाधव):-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग बागलाण तालुका मेळावा राज्य कार्यवाह /सरचिटणीस संजय बबनराव पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये जिल्हा नेते रमेश रघुनाथ गोहिल, उपाध्यक्ष दिपक खैरनार, दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, कार्यवाह रविंद्र ह्याळीज संघटनेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी अरविंद माळी(नाशिक पतसंस्था संचालक),पोपट अहिरे , मिलिंद इंगळे, देवळा कार्यवाह राजेंद्र जाधव उपस्थित होते.राज्य कार्यवाह संजय पगार यांनी शिक्षक परिषदेने आज पर्यंत शिक्षक बदल्या, वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या विरोधातील आंदोलन निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव कथन केले. शिक्षक परिषद आंदोलन हाती घेताना कशा प्रकारे तयारी करते व शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो , यापुढे शिक्षक परिषद चटोपाध्याय वेतनश्रेणी, शालेय पोषण आहार, जिल्हा बदली वेतनश्रेणी, महिलांचे प्रश्न, शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील.परिषदेच्या आजच्या मेळाव्यात भरभरून साथ दिली. तुमच्या सर्वांच्या न्याय हितासाठी शिक्षक परिषद अविरत कार्यरत राहील बागलाण तालुक्यात जेव्हा जेव्हा शिक्षक बोलावतील तेव्हा बागलाण कार्यकारणी सोबत स्वतः हजर राहून लक्ष घालून कामे मार्गी लावले जातील. असे पगार यांनी सांगितले.
बागलाण तालुक्यातील सभासद नोंदणी केल्यानंतर कार्यकारणी पुनर्गठन करण्यात आले तालुकाध्यक्ष- पुंजाराम जाधव, सरचिटणीस/कार्यवाह-संजय पाटील , कार्याध्यक्ष -रत्नाकर सुर्यवंशी व संजय बागुल,कोषाध्यक्ष -निळकंठ देवरे ,संघटनमंत्री -कैलास पाटील, सहकार्यवाह – अनिल सोनवणे, रमेश सावंत,उपाध्यक्ष -भिमराव जाधव,किरण खैरनार,सल्लागार -कारभारी जगदाळे, तालुका प्रतिनिधी प्रकाश खैरनार,सेवानिवृत्त प्रतिनिधी -काशिनाथ देवरे , महिला आघाडीप्रमुख रंजना शेवाळे , प्रतिनिधी सरला जाधव, सुनिता पवार सहभागी झाल्या.महिला दिनानिमित्त महिला आघाडी प्रमुख व प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र जाधव तर आभार पुंजाराम जाधव यांनी मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510