





देवळाली गाव येथे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम जयंती “वाचन प्रेरणा दिन”, ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शनी साजरी
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार: दि.15 ऑक्टोबर 2023
β⇒नाशिक रोड (देवळाली) , ता. 15 (प्रतिनिधी : डॉ कृष्णा शहाणे ) :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र देवळाली यांच्या वतीने येथे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन व प्रेरणा दिन , ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन विविध कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमास उपस्थित रमेश जाधव, असलम भैया मणियार, विलास गोडसे, मनोहर कोरडे, रवींद्र मालुंजकर, प्रा.डॉ. कृष्णा शहाणे, पोपटराव देवरे, योगेश गाडेकर, बाळनाथ मामा सरोदे, इरफान शेख, रामचंद्र शिंदे, व्हि.एन.पाटील, अरुण घोडेराव, कल्पना गडाख, चित्रा ढिकले, चंद्रकांत डबे, प्रशांत पेंढाळकर, काका हंडोरे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर विद्यार्थी आणि महिला वर्ग यांनी देवळाली गावातून ग्रंथ दिंडी, ग्रंथपालखी काढली. ग्रंथ दिंडीचा समारोप झाल्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध गोष्टीची पुस्तके वितरित करण्यात आली. याप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक मंगेश लांडगे, सल्लागार समिती सदस्य पंकज देशमुख, केंद्र संचालक हिरे, सौ विद्या पाटील, ग्रंथपाल श्रीराम सोनवणे व योगिता विधाते यांनी परिश्रम घेतले.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
