





भिका वाघमारे यांचा मृत्यूदेह नदीपात्रात सापडला, कुटूंबावर शोककळा
कुकुडमुंडा गावातील खळबळजनक घटना
दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज : सुरगाणा प्रतिनिधी : एकनाथ शिंदे
सुरगाणा, ता.२२ (दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज वृत्तसेवा ) :- सुरगाणा तालुक्यातील कुकुडमुंडा येथील भिका माऊजी वाघमारे वय 50 हे मंगळवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले. घरात शोधशोध सुरु झाली मात्र दिसले नाहीत. त्यामुळे गावकर्यांनी परिसरात शोध घेत शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास खोबळा येथील नदीपात्रात त्यांचा मृत्यूदेह सापडला. सदर घटनेमुळे वाघमारे कुटूंबावर शोककळा पसरली आहे. कुकुडमुंडा गावातील खळबळजनक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे , त्याच्या पश्चात 2 मुले व 4 मुली असा परिवार आहे.
दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज : मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले ,मो .८२०८१८०५१०