





“मोबाईल सारखे हत्यार विद्यार्थ्यांच्या हाती न देता त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करावे” : मविप्र सभापती – श्री बाळासाहेब क्षीरसागर

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 3 जून 2024
β⇔सायखेडा ( नाशिक) दि.3 ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम) :- 21 व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना अनेक समस्या व आव्हानांना सामोरे जाताना पालकांनी पाल्याच्या गुणवत्तेविषयी सतत जागृत राहून मोबाईल सारखे हत्यार विद्यार्थ्यांच्या हाती न देता त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करावे. शिक्षकांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावून शाळा व संस्था यांचा नावलौकिक वाढवावा. असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. ते जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कनिष्ठ महाविद्यालयाच्या पालक शिक्षक मेळाव्यात अध्यक्षपदावरून बोलत होते .प्रारंभी सरस्वती पूजन पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ निकम यांनी केले.

मविप्र निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख म्हणाले की आपल्या पाल्याच्या निश्चित उद्दिष्टासाठी शाळा संस्था प्रयत्न करीत असतात .त्यात पालकांनी सहकार्य करून आपल्या पाल्याचा विकास साधावा व त्याला त्याच्या पायावर उभे करणे ही आजच्या काळाची गरज आहे असे ते म्हणाले. पालकांना मार्गदर्शन करतांना सायखेडा पोलीस स्टेशन चे पीएसआय प्रकाश सैंदाने साहेब म्हणाले की,आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातात मोटरसायकल, चार चाकी देताना त्यांचे वय वर्ष 18 पूर्ण आहे की नाही,नसेल तर कोणतेही वाहन प्रवासाठी देवु नये.कारण काही अपघात झाल्यास पालकांना कैद व आर्थिक दंड होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.याप्रसंगी वृक्षारोपण, महावाचन कार्यक्रम व उल्हास ट्रस्ट आयोजित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी रूपये 1000/- शिष्यवृत्ती वाटप मा.सभापती श्री.बाळासाहेब आप्पा क्षीरसागर यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख , शालेय समितीचे अध्यक्ष विजय कारे, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष कमलाकांताचार्य महाराज, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले, शालेय समितीचे सदस्य संजय कांडेकर, सायखेडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रकाश सैंधाने , मनोज भुतडा, नंदू भाऊ राजोळे,विभाग प्रमुख आनंदा हारदे, दिलीप कांडेकर, संजय जगताप , पर्यवेक्षक राम ढोली उपस्थित होते. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष विजय कारे मार्गदर्शन करताना म्हणाले की पालकांनी शाळेला व शिक्षकांना सहकार्य करून जास्तीत जास्त गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे.यावेळी बाजीराव विठ्ठल पवार या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विभाग प्रमुख संजय जगताप पालकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा शिंदे यांनी केले तर आभार श्री पवार सर यांनी मानले . या कार्यक्रमास बहुसंख्य पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.