





महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी गुन्हेगारांना फाशीची शिक्षाच योग्य

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 26 ऑगस्ट 2024
β⇔ नागपूर,दि.26 (प्रतिनिधी : रमेश लांजेवार ):- मुलींवरील वाढत्या अत्याचारांने संपूर्ण हद्दीपार करून शिखर गाठला आहे.त्यामुळे सर्वप्रथम कोणत्याही परिस्थितीत पोलिसांकडून गुन्हेगारांचे लचके तोडून त्यांना कठोर शिक्षा देण्याची नितांत गरज आहे.कारण छोट्या-छोट्या मुलींवरील अत्याचारांच्या घटनांनी सर्वांचीच मनस्थितीत संतापजनक झाली आहे.कारण सर्वच स्तरातून मागणी उठत आहे की पिडीतांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने गुन्हेगारांवर कठोर कारवाई अपेक्षित आहे.कारण गुन्हेगारांवर कठोर कारवाया झाल्या नाहीत तर अशा भयावह घटना वाढत जाईल.त्यामुळे राज्यात किंवा देशात गुन्हेगारांवर अशा कारवाया व्हायला पाहिजे की दुसऱ्या गुन्हेगारांवर त्याचा ताबडतोब परिणाम झाला पाहिजे. यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण होईल व पुन्हा गुन्हां करतांना शंभरदा विचार करावा लागेल.देशातील अनेक राज्यांतील मुलींवरील व महिलांवरील अत्याचारा पहाता अंगावर शहारे येतात. नुकताच पश्चिम बंगालची महिला अत्याचाराची घटनेचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले.यावर शेवटी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला.अशा अनेक घटना दिवसेंदिवस कमी न होता वाढतच आहे हा देशासाठी व देशातील प्रत्येक राज्यांसाठी मोठा गंभीर विषय बनला आहे. नुकताच महाराष्ट्रात बदलापूर घटनेने शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात दिवसेंदिवस मुलींवरील व महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. आपण ज्यांना देवाघरी फुले म्हणतो अशांना कोणी इजा पोहचवित असेल व अत्याचार करीत असेल तर त्याला जागीच ठेचले पाहिजे.यासाठी सरकारने पोलिस विभागाला खुली सुट देणे अत्यंत गरजेचे आहे.पोलिस गुन्हेगारांना पकडतांना आपला जीव धोक्यात टाकतो व गुन्हेगाराला पकडतो.परंतु अट्टल गुन्हेगार कायद्याच्या चाकोरीतून सुटतो.ही सुध्दा पोलिस विभागासाठी चिंताजनक बाब आहे.त्यामुळे सर्वप्रथम पोलिसांकडुन गुन्हेगारांना असय्य यातना अती आवश्यक आहे.कारण गुन्हेगारांना जास्त दिवस जेलमध्ये ठेवले तर त्यांना मोकळीक होण्यासाठी अनेक मार्ग निवडता येतात.जसे की,जमानत,पेरॉल,बेल फिर वही खेल ह्या संपूर्ण घटनाक्रम सर्वांच्याच डोळ्यापुढे आहे.त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांच्या मार्फत जागीच ठेचले पाहिजे.महिलांवरील अत्याचार व बलात्कारांमध्ये अट्टल गुन्हेगारांचा समावेश आहेच सोबतच यात राजकीय पुढारीसुध्दा मोठ्या प्रमाणात गुरफटलेला आहे. त्यामुळे प्रश्न आहे की कठोर कारवाईचे प्रावधान केव्हा? महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील अत्याचारांच्या घटनेमुळे देशातील नागरिकांचे व पालकांचे मन हेलावले आहे.देशातील अनेक राज्यात महिलांवरील अत्याचार व बलात्कार करून खून करने अशा अनेक भयावह घटना झाल्यात.परंतु गुन्हेगारांवर कायद्याच्या चाकोरीतून जेव्हा कारवाई होतांना आपण पहातो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटले.कारण कायद्याच्या चाकोरीतून हजारो कागदांची फाईल तयार होते व तारीख पे तारीख असा लपंडाव सुरू असतो व कालांतराने जमानत मिळते व गुन्हेगार सुटतो सुध्दा त्यामुळे अशा गुन्हेगारांवर पोलिसांच्या मार्फत तोडायला पाहिजे व फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून कठोर कारवाई व्हायला हवी. गुन्हेगारांसाठी कायदा करणारे नेतेमंडळी सुध्दा महिला अत्याचारांच्या बाबतीत मागे नाहीत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉम्स (एडीआर) आणि न्यु इलेक्शन वॉच यांनी महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.त्यानुसार १५१ विद्यमान खासदार आणि आमदारांवर महिला अत्याचारांचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच्यावरील कारवाई अत्यंत संथगतीने सुरू असते व कालांतराने धनसंपत्तीच्या बळावर गंभीर गुन्ह्यांतुन मुक्त सुध्दा होतात.हे तर फक्त विद्यमान आमदार-खासदार झालेत या व्यतिरिक्त आजी-माजी आमदार-खासदार किती असतील याचा अंदाज आपण लावु शकतो.त्यामुळे राजकीय पुढारी असो अथवा अन्य गुन्हेगार त्यांची चामडी सर्वप्रथम पोलिसांच्या मार्फत उधळली पाहिजे व नंतर बाकिच्या कारवाया व्हायला हव्या.बलात्कार अशा भयावह घटनाच्या गुन्हेगारांवर सरकार फाशीचे बिल अजुन पर्यंत पारीत करू शकले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.कारण या गुन्ह्यामध्ये राजकीय पुढारी व भोंदू बाबांचा जास्त भरणा आहे ही बाब सर्वांनाच चांगल्याप्रकारे ग्यात आहे.अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण एवढे वाढले आहे की ज्याची आपण कल्पना सुध्दा करु शकत नाही.मुलींवरील अत्याचारांच्या घटनेचा मोटा-मोटा आढावा घेतला तर मागील एका आठवड्याभरातील घटनाक्रम याप्रमाणे १३ ऑगस्ट बदलापूर,१५ ऑगस्ट पुणे,२० ऑगस्ट अकोला,२० ऑगस्ट मुंबई,२१ ऑगस्ट नाशिक,२१ ऑगस्ट पुणे,२१ ऑगस्ट मुंबई,२२ ऑगस्ट नागपूर,२२ ऑगस्ट कोल्हापूर अशाप्रकारे आठवड्याभरातील मुलींवरील अत्याचारांच्या घटना आहेत.यावरून प्रश्न उपस्थित होतो की राज्यातील मुली खरोखरच सुरक्षित आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.त्यामुळे मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून फाशीची शिक्षा व्हायला हवी.
लेखक :
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )