β : पुणे :⇔ शंकरराव उरसळ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयचे ऐतिहासिक आगाखान पॅलेस “स्वच्छता ही सेवा” मोहीम संपन्न – ( प्रतिनिधी : विपुल धसाडे )
β : पुणे :⇔ शंकरराव उरसळ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयचे ऐतिहासिक आगाखान पॅलेस "स्वच्छता ही सेवा" मोहीम संपन्न - ( प्रतिनिधी : विपुल धसाडे )
शंकरराव उरसळ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयचे ऐतिहासिक आगाखान पॅलेस “स्वच्छता ही सेवा” मोहीम संपन्न
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 30 ऑक्टोबर 2023
β⇔पुणे, ता. 30 ( प्रतिनिधी : विपुल धसाडे ) :- आगाखान पॅलेस या महत्त्वाच्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणांचे संवर्धन योग्य रीतीने करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पुढील पिढीं-पर्यटकांसाठी भारतीय स्वातंत्र्य इतिहासाची माहिती जतन होण्यास मदत होणार आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या योजनेअंतर्गत प्रेरित होऊन आजच्या युवकांनी स्वच्छता ,वृक्ष संवर्धन मोहिमेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य डॉ. अशोक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.
भारतीय ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणांपैकी महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे स्थित सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाण म्हणजे आगाखान पॅलेस होय . सदर ऐतिहासिक ठिकाण हे आर्किऑलॉजी सर्वे ऑफ इंडिया संलग्न आहे .पुणे जिल्हा शिक्षण मंडळ खराडी येथील शंकरराव उरसळ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी भेट दिली.
यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत 100 विद्यार्थी स्वयंसेवकांनी “स्वच्छता ही सेवा” मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केले. गजानन मंडावरे वरिष्ठ संवर्धन सहाय्यक भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व रवींद्र दाभाडे एम टी एस अधिकारी आगाखान पॅलेस यांनी या मोहिमेचे उद्घाटन करून सर्व सहभागी स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. यावेळी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी किरण घुले, नितीन नेहरकर, अंजली पांडे, शिक्षकेतर सेवक श्रीकृष्ण थेटे, सिद्धेश्वर सुरवसे, ऋषिकेश मुळे उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो.८२०८१८०५१०