Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंग

β : नाशिक :⇒ सूनंदाताई गोसावी कला दालानाचे  २१ ऑगस्ट रोजी उद्घाटन संपन्न – ( प्रतिनिधी :  छाया लोखंडे -गिरी  )

β : नाशिक :⇒ सूनंदाताई गोसावी कला दालानाचे  २१ ऑगस्ट रोजी उद्घाटन संपन्न - ( प्रतिनिधी :  छाया लोखंडे -गिरी  )

0 0 2 3 9 9

सूनंदाताई गोसावी कला दालानाचे  २१ ऑगस्ट रोजी उद्घाटन संपन्न 

β दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: नाशिक: सोमवार : दि. 21 ऑगस्ट 2023

  β नाशिक , 21( प्रतिनिधी :  छाया लोखंडे -गिरी  ) :- येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहाच्या प्रांगणात नव्याने सुरू होणाऱ्या सुनंदाताई गोसावी कलादालनाचे उद्घाटन सोमवार दि २१ ऑगस्ट सकाळी ११ वा. प्रसिद्ध चित्रकार श्री. पंडित खैरनार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध चित्रकार श्री. पंडित खैरनार, संस्थेच्या सचिव व कार्यक्रमाच्या अध्यक्षा , महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे , संस्थेचे विश्वस्त व सहखजिनदार डॉ. आर. पी. देशपांडे , संस्थेचे नाशिक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.डॉ. सौ कविता पाटील व प्रा. डॉ. सौ. नीलम बोकिल चित्रकला विभाग प्रमुख प्रा. अर्चना सोनवणे उपस्थित होते.

                         कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदक्षिणा हॉलचे आर्किटेक्ट प्रा.श्री संजय पाबारी ह्यांनी केले. त्यांनी ह्या कला दालनाचा उद्देश स्पष्ट केला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.डॉ. सौ नीलम बोकिल ह्यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होईल असे त्या म्हणाल्या.   प्रसंगी नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार श्री रामदास महाले, श्री केशव मोरे, श्री. बाळकृष्ण नगरकर, प्रा.श्री दिनकर जानमाळी प्रा.संजय बागुल, वाघोतकर , शिल्पकार श्री तेजस गर्गे , श्री सुरेश भोईर , श्री अशोक धिवरे, श्री. अनील अभंगे , आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री प्रफुल्ल सावंत प्राचार्य श्री प्रफुल्ल चव्हाण प्रा. संध्या केळकर , सौ मुक्ता बालिगा , प्रा. छाया खुळगे, प्रा. धनंजय गोवर्धने , प्राचार्य मुंजा नरवडे आर्किटेक्ट वैशाली प्रधान , आर्किटेक्ट श्री संजय पाटील , आर्किटेक्ट श्री संजय बोरसे, आर्किटेक्ट अमोल चौधरी ह्यांना संस्थेतर्फे व महाविद्यालयाच्या चित्रकला विभागातर्फे गौरविण्यात आले. श्री अनील अभंगे ह्यांनी आपले मनोगत सत्कारार्थींच्या वतीने व्यक्त केले. ते म्हणाले की हे कलादालन फक्त नाशिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून कलाकार येऊन ह्या कलादालनाचा लाभ घेतील. ह्या . प्रसंगी रश्मी मंजिथाया , गार्गी देवधर , कविता प्रजापती , रोहिणी मैंद नुपुरा जोशीऋतुजा पल्लवी हरदास , स्नेहल एकबोटे . शिवानी दीक्षित ह्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
             मुख्य अतिथी चित्रकार श्री पंडित खैरनार आपल्या भाषणात म्हणाले की विद्यार्थिनींनी त्यांच्या ५ वर्षाच्या अध्ययन काळात चित्रकले चे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करावे. त्यांनी प्रसिद्ध चित्रकार शिवाजी तुपे, प्रफुल्ल सावंत ह्यांच्या चित्रांची उदाहरणे देत विद्यार्थिनींना अध्ययनासाठी प्रवृत्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या सचिव व प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांनीनव्यानेच उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या प्रांगणात असलेले हे वातानुकूलित कलादालन सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी युक्त असून नाशिकच्या बाहेरून येणाऱ्या कलावंतांची निवास व्यवस्था ही येथे करण्यात आली आहे , तसेच कलेच्या विद्यार्थ्यांसाठी हे कलादालन सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणार असल्याचे एस एम आर के महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच गोखले एज्युकेशन संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या १०६ वर्षाचा प्रदीर्घ गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला. संस्थेचा गुणात्मक व संख्यात्मक विकास केला असे त्या म्हणाल्या. त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना हक्काचे कला दालन उपलब्ध झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
 नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच कॉलेज रोडवर असलेल्या या कलादालनाचा उद्देश नाशिकच्या तसेच नाशिकच्या बाहेरील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचे चित्र प्रदर्शन आयोजित करणे तसेच चित्रकला, शिल्पकला, छायाचित्र या कलांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभरातील मोठ्या कला दालनांसारखे सारखे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.  यावेळी नाशिकच्या कलाक्षेत्रात मोठे योगदान असणाऱ्या स्व. वा.गो. कुलकर्णी, शिल्पकार मदन गर्गे आणि निसर्ग चित्रकार शिवाजी तुपे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.याचबरोबर एस एम आर के महाविद्यालयातील दृश्यकला विभागाच्या विद्यार्थिनीं तसेच प्राध्यापकांच्या रंग स्पर्श या प्रदर्शनाचे आयोजन आणि प्रसिद्ध कलाकारांची निसर्ग चित्रण, व्यक्तिचित्रण यांची प्रात्यक्षिके आणि संवाद सत्र यांचे आयोजन करण्यात आले .
             नव्यानेच उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या प्रांगणात असलेले हे वातानुकूलित कलादालन सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी युक्त असून नाशिकच्या बाहेरून येणाऱ्या कलावंतांची निवास व्यवस्था ही येथे करण्यात आली आहे. तसेच कलेच्या विद्यार्थ्यांसाठी हे कलादालन सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणार असल्याचे उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. अश्लेषा कुलकर्णी ह्यांनी केले. उपस्थितांचे आभार चित्रकला विभाग प्रमुख प्रा. अर्चना सोनवणे ह्यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे उपप्राचार्य , प्राचार्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थिनी ह्यांची उपस्थिती होती.

β :  नाशिक :⇒ सूनंदाताई गोसावी कला दालानाचे  २१ ऑगस्ट रोजी उद्घाटन संपन्न -  ( प्रतिनिधी :  छाया लोखंडे -गिरी  )
β : नाशिक :⇒ सूनंदाताई गोसावी कला दालानाचे  २१ ऑगस्ट रोजी उद्घाटन संपन्न – ( प्रतिनिधी :  छाया लोखंडे -गिरी  )

β दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!