सुरगाणा -अंबाठा प्रबोधन माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा- ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
सुरगाणा -अंबाठा प्रबोधन माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा- ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
अंबाठा प्रबोधन विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : सुरगाणा प्रतिनिधी : एकनाथ शिंदे.
सुरगाणा , ता.10 दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : सुरगाणा तालुक्यातील अंबाठा येथे 9ऑगस्ट रोजी प्रबोधन माध्यमिक विद्यालय अंबाठा येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमण चौधरी( हनुमंत पाडा चापावाडी )हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सिस्टर थेरेसा हया होत्या.कार्यक्रमाच्या सुरवातीला आदिवासी क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन,अध्यक्ष,प्रमुख पाहुणे, व परीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळेतील 12 गटांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्रथम क्रमांक इयत्ता दहावी मुली अ गट, द्वितीय क्रमांक दहावी मुली ब गट, तृतीय क्रमांक इयत्ता नववी मुली ब गट यांनी पटकावला. सर्व विद्यार्थ्यांनी हिरारीने भाग घेतला. व सुंदर रित्या स्टेजवर सादरीकरण केले. सर्वांचे गावित सरांनी कौतुकास्पद अभिनंदन केले. फादर प्रफुल यांनी गाण्याचे नियोजन व तांत्रिक काम पाहिले. तर कुमारी लीला मनीषा व कुमार मुकेश व भूषण आणि शुभम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन फादर प्रफुल व गावित सरांनी केले. त्यानंतर कुमार भूषण गायकवाड याने कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले.व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, मोबाईल . ८२०८१८०५१०.