13000 कोटी नदीजोड सुधारित प्रस्ताव खासदारानंतर आता सिन्नर आमदाराकडून होतोय पाठपुरावा
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 7 जून 2024
β⇔नाशिक, दि.7 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-सिन्नर विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाला नदीजोड प्रकल्पाद्वारे पाणी मिळवून देण्यासाठी सुधारित 13 हजार 250 कोटीचा प्रस्ताव नाशिकच्या पश्चिम वाहिनी नद्यातून नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक समितीला सादर करण्यात आला आहे. समितीची शिफारस होऊन शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल. आचारसंहिता नंतर त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण दुष्काळी सिन्नर तालुक्याचे भाग्य उजळणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र हा प्रकल्प सर्व समावेशक असावा, अशी मागणी करीत सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यात काही सुधारणा असल्यास ते सुचवत पुन्हा एकदा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सादर केला आहे.
नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील समुद्रात वाहून जाणारे पाणी दमणगंगा व वैतरणा खोऱ्यातील पाणी वैतरणा धरणात सोडण्यात येणार आहे. तेथून ते कळवा धरणाद्वारे दारणा व बोरखिंड धरणात सोडण्यात येणार आहे. बोरखिंड धरणातून देव नदीत आणि देव नदीतून पूर कालवे व अन्य मार्गातून तालुक्यातील विविध भागात सोडले जाणार आहे. तालुक्याच्या शेतीला व घरगुती वापरासाठी हे पाणी सोडले जाणार असून त्यातून शिल्लक पाणी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर साठी मिळणार आहे.
सिन्नरच्या दुष्काळी पट्ट्यातील गोंदे व सुळेवाडी या दोन गावचा परिसर सर्वाधिक उंचावर आहे. सोनंबे मार्गे शरद वाढीच्या पुढे देशपांडे तेथील ढग्या डोंगराच्या आत बोगदा करून हे पाणी सुळेवाडी येथे जाईल. तेथून पूर्ण भागातील वितरण व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरातील देशवंडी नायगाव, जायगाव ,पाठपिंपरी, बारागाव पिंपरी, निमगाव, सिन्नर, हिवरगाव, कोमलवाडी, वडांगळी, व गुळवंच मार्गे खोपडी, देवपूर मार्गे पाण्याची वितरण व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. गोंदे होऊन शेवटच्या वारेगाव – सायाळे या गावापर्यंत हे पाणी जाणार आहे. देशवंडी येथून सोडण्यात येणारे पाणी कळवा कालव्यात सोडण्यात येणार आहे. उन्हाळ्यातही कळवाला आवर्तन येईल, त्यामुळे कळव्याचे तीन ते चार आवर्तने होतील.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)