Breaking
कृषीवार्तागुन्हेगारीब्रेकिंग

β : सुरगाणा :⇔सुरगाणा तालुक्यात आगीत पिक जळून खाक , कासटबारी शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान भरपाईची मागणी- ( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार )

β : सुरगाणा :⇔सुरगाणा तालुक्यात आगीत पिक जळून खाक , कासटबारी शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान भरपाईची मागणी- ( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार )

018491

सुरगाणा तालुक्यात आगीत पिक जळून खाक , कासटबारी शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान भरपाईची मागणी

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज  : नाशिक : शुक्रवार : दि २८ डिसेंबर २०२३
β⇔सुरगाणा ता २८ ( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार ) : सुरगाणा तालुक्यातील कासट बारी येथे अज्ञात व्यक्तीने खळ्यात रचून ठेवलेली भात, नागली ,उडीद, वरई पिकांची १० ते १५ उडवी रात्री साडेबाराच्या सुमारास पेटून दिल्याचे जयराम वार्डे, रंगनाथ वार्डे ,रमेश वार्डे यांनी सांगितले. सदर घटनेने शेतकरी बांधवांचे लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यात चोऱ्या, लूट, नुकसान करणे अशा घटना वारंवार घडत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
                   दरम्यान सदर घटनेत रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यतीने खळ्यामध्ये रचून ठेवलेले भात पिकांची ४ उडवी , नागली पिकाची २ उडवी , उडीद पिकाची ३ उडवी, वरई पिकाची ३ उडवी अशी सुमारे १२ उडवी रात्री बारा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिली त्या आगीत सर्व पिकाची राख झाली आहे. मात्र रात्रीच्या सुमारास अचानक जाग आल्याने रमेश सोमा वार्डे हे घराबाहेर गेल्यानंतर आग लागल्याचे समजले पण ही आग जवळच खळा असलेल्या जागेवर दिसत असल्याने शंका आली आणि त्यांनी लागलीच शेजारीच राहत असलेल्या जयराम वार्डे, रंगनाथ वार्डे ,रमेश वार्डे यांना आवाज देऊन उठवले आणि खळ्यात साठवून ठेवलेल्या पिकांना आग लागल्याचे सांगितले. शेतातील घटनास्थळी खळ्यात जाईपर्यन्त शेतामधील लाखो रुपयाचे पिक जाळून खाक झाले होते . त्यामुळे जयराम वार्डे, रंगनाथ वार्डे ,रमेश वार्डे या शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पीकांचे नुकसान झाले आहे मागील वर्षी देखील याच गावातील भागवत गावंडे व पातुबाई पवार यांची भात नागरी , वरई (वरी ) उडदाची उडवी पूर्वी पेटवून दिली होती.

               सुरगाणा तालुक्यात बऱ्याच वर्षापासुन समाज कंटाकानी शेतकऱ्यांना हैराण करुन सोडले आहे. शेतकरी बांधव रात्रंदिवस राबराब राबतो, कष्ट करुन धान्य पिकवतो आणि त्या कष्टकऱ्याला वर्षभराच्या मेहनतीवर समाज कंटक एका झटक्यात आग लावतो. रात्री अंधाराचा फायदा घेत बाऱ्हे जवळील कासटबारी या गावातील शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करुन शेतात पिकलेलं पीक ,धान्य खळ्यामध्ये मळणी करण्यासाठी खळ्यात हे पीक आणून ठेवतात . त्यांनतर सदर पीक मळणी करून घरी घेतले जाते. अशा प्रकारचे घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारी प्रवूत्तीवरती कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. शासनाने त्वरित घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी सुरगाणा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो.८२०८१ ८०५१० 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!