





बी.एल.ओ आदेश नेमणुकांमध्ये अनियमितता
शिक्षक परिषद शिष्टमंडळाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.21 मार्च 2024
β⇔दिंडोरी ( नाशिक)दि. 21 ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):-दिंडोरी तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी बी एल ओ आदेश प्राथमिक शिक्षकांना दिले. सदर आदेश देत असताना उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार बीएलओ आदेश न दिल्याने महाराष्ट्र राज्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने उपजिल्हाधिकारी मंगरूळे यांना संजय बबनराव पगार राज्यकार्यवाहक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन झालेल्या अन्यायाबाबत दाद मागण्यात आली.

उपजिल्हाधिकारी मंगरूळे यांनी उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून दिलेल्या आदेशांचे पुनर्निरीक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रत्येक गावात शिक्षकांव्यतिरिक्त इतर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्य क्रमाने अगोदर आदेश दिले जावे अपरिहार्य कारणास्तवच शिक्षकांना आदेश देण्यात यावे.अशी निवेदनात मागणी करण्यात आली.
त्यानंतर दिंडोरी येथे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांची शिष्टमंडळाने सर्व बी एल ओ समवेत भेट घेऊन शिक्षकांवर कशाप्रकारे अन्याय झाला ही बाब निदर्शनास आणून दिली. साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली.निवडणूक कामानिमित्त तालुक्यातील दुर्धर आजार ग्रस्त शिक्षक, स्तनदा माता, गरोदर माता, दिव्यांग शिक्षक यांनी वैयक्तिक दिलेल्या अर्जाचा विचार करून त्यांच्या नेमणुका रद्द करण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी केली.
याप्रसंगी जिल्हा नेते रमेश गोहिल, उपाध्यक्ष दीपक खैरनार, दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, इगतपुरी तालुकाध्यक्ष वैभव उपासनी,तालुका कार्याध्यक्ष सुभाष बर्डे, कार्याध्यक्ष रवींद्र भरसट,कोषाध्यक्ष नितीन शिंदे,संघटक कैलास बांगर, विनोद महाले,अरुण रोडे , प्रेमचंद भोये, कैलास पवार ,सुनील माळी,शैलेश कांदळकर ,सुरेश भोये,नंदकिशोर नागपुरे, देविदास राठोड ,जनार्दन राऊत, श्रद्धा शिंदे,हिराबाई महाले आदी उपस्थित होते.
“उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी योग्यवेळी बदल करण्याचे आश्वासन दिले असले तरी शिक्षकांच्या न्यायासाठी संबंधित बी एल ओ कामाविरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करत आहोत.”-संजय बबनराव पगार,ज्य कार्यवाह/सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०