





त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 6 डिसेंबर 2023
β⇔त्र्यंबकेश्वर,ता. 6 ( प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ) :- येथील मविप्र कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे दि. ६ डिसेंबर रोजी महामानव विश्वरत्न,भारतरत्न, दलितांचा कैवारी,राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्राचार्या डॉ. दिलीप पवार यांनी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. दिलीप पवार यांनी सांगितले की,” विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे जीवनातील महत्त्व व दृष्टी दिली. त्यांनी आपल्या कष्टातून कार्य व कृतीतून माणसातील मुल्यांची शिकवण दिली.त्याच बरोबर वाचनाने समाज अधिक प्रगल्भ व समृद्ध होतो. म्हणून समाजाला उद्देशून शिका,संघटित व्हा व संघर्ष करा या मूलमंत्राचे महत्व स्पष्ट केले आहे. छत्रपती शाहूमहाराज , सयाजीराव गायकवाड यांनी डॉ आंबेडकर यांना शिष्यवृत्ती शिक्षणासाठी दिली. त्यांनी स्त्रीशिक्षणासाठी अधिक लक्ष्य वेधले आहे. डॉ. आंबेडकर यांची आवडती जागा ग्रंथालय होती असे सांगितले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे महापारीनिर्वान दिनाचे महत्व विषद करत त्यांच्या मूल्यांचे गुण अंगिकारले पाहिजे, तरच त्यांना खरी आदरांजली अर्पण होईल असे सांगितले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. शरद कांबळे, डॉ. संदीप निकम, प्रा.नीता पुणतांबेकर,प्रा.उत्तम सांगळे, प्रा. समाधान गांगुर्डे , डॉ. राजेश झणकर,डॉ.भागवत महाले,प्रा.संदीप गोसावी,डॉ.संदीप माळी, प्रा.प्रशांत रणसुरे,डॉ.अजित नगरकर,प्रा.मनोहर जोपळे, प्रा .विष्णू दिघे,ग्रंथपाल प्रा.वर्षा जुन्नरे,श्री.दिनेश राठोड,श्री.योगेश ढोली, प्रा.विद्या जाधव,प्रा.मंजुषा नेरकर,प्रा.रोहिणी घोटेकर,प्रा.प्रियंका शिंदे,प्रा स्वाती संगमनेरे,प्रा.अर्चना धारराव,डॉ. सोनाली पाटील, डॉ.मनीषा पाटील,प्रा.योगिनी पगारे,प्रा.वर्षा मोगल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.८२०८१८०५१०
