“देशाची सर्वात मोठी आधार शक्ती व संपत्ती म्हणजे विद्यार्थी “–श्री. नितीन उपासनी
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज वृतसेवा :प्रतिनिधी नाशिक :प्रा . छाया लोखंडे- गिरी
नाशिक, ता . १० (दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज वृतसेवा ) :- गोखले शिक्षण संस्थेच्या नव्याने उद्घाटन झालेल्या ‘गुरुदक्षिणा ‘ संकुलात आज मान्यवरांच्या उपस्थितीत आज संस्थेचे संस्थापक प्राचार्य टी.ए. कुलकर्णी ह्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ’ बांधण्यात आलेल्या प्रिं.टी. ए. कुलकर्णी ‘ सभागृहाचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. ते पुढे म्हणाले , की स्वामी विवेकानंदाचा हा देश आहे. मोठा सांस्कृतिक वारसा असलेल्या देशाचे नेतृत्व तुम्हाला करायचे आहे.आजचा विद्यार्थी वाचन , संवाद ह्या पासून दूर झाला आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थे बद्दल त्यांनी परखड विचार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की अपयशावर मात ही करता येते. वाटेतील प्रलोभनांवर मात करून पुढे जा.
याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई व नाशिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष श्री नितीन उपासनी प्रमुख अतिथी ह्या नात्याने उपस्थित होते. तर प्रसिद्ध माध्यम तज्ज्ञ भूषण मटकरी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. सौ दीप्ती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन झाले. व्यासपीठावर संस्थेचे सह खजीनदार व विश्वस्त प्राचार्य डॉ. आर.पी. देशपांडे , विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्या डॉ. सुहासिनी संत प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर उपस्थित होते.
प्रसंगी संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.त्यांनी विद्यार्थ्यांना आपली ताकद देश कार्यासाठी वापरा व चांगले नागरिक बना. सन्माननीय आतिथी श्री भूषण मटकरी ह्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की स्वतःच्या आयुष्याचे ध्येय स्वतः निश्चित करा. व त्याप्रमाणे दृढ निश्चय करून ध्येयाप्रती वाटचाल करा. यश निश्चित मिळेल. आपल्या अनुभवातून त्यांनी करियरची अनवट वाट चोखाळण्यास प्रवृत्त केले. चौकटीतील आयुष्याच्या बाहेर डोकावण्याचा सल्ला त्यांनी संवादातून दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ आर पी देशपांडे ह्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कठीण परिस्थितीतून मार्ग शोधत यशस्वी बनणाऱ्या महान व्यक्तींची उदाहरणे त्यांनी दिली. संधी ही सहज मिळत नसते तर ती मिळवायची असते असे ते म्हणाले. अभिषेक पाटील व भूमिका काकळीज ह्या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या विविध विद्यालय व महाविद्यालयांमधील १० वी १२ च्या परीक्षेत उत्तम यश मिळविणाऱ्या एकूण ६४ विद्यार्थ्यांना ह्या वेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी उपप्राचार्य डॉ सौ. कविता पाटील , डॉ . सौ . निलम बोकील , डॉ. प्रणव रत्नपारखी, डॉ. लीना भट ह्यांनी विशेष मेहनत घेतली. मान्यवरांच्या प्रती आभार बी.वाय.के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी ह्यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अश्लेषा कुलकर्णी व प्रा.डॉ. स्नेहा रत्नपारखी ह्यांनी केले.
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज वृतसेवा :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले ,मो . ९१८२०८१ ८०५१०