





बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न

β⇔नाशिकरोड ,दि.1(प्रतिनिधी :संजय परमसागर):-_गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात बुधवार दि. १ मे रोजी स. ८ वा. महाविद्यालयाच्या जिमखाना ग्राउंड वर महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ.आकाश ठाकूर,विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. के. सी. टकले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे,पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या डॉ.श्रद्धा देशपांडे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )