β : दिंडोरी :⇔”नांदगाव शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षक परिषद आक्रमक भूमिका घेणार”:संजय पगार-शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस/कार्यवाह-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी :⇔"नांदगाव शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षक परिषद आक्रमक भूमिका घेणार":संजय पगार-शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस/कार्यवाह-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)
“नांदगाव शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षक परिषद आक्रमक भूमिका घेणार” : संजय पगार – शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस/कार्यवाह
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 7 मार्च 2024
β⇔दिंडोरी, दि.7(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव):-नांदगाव तालुक्यात गंगाधरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संजय पगार राज्य सरचिटणीस/कार्यवाह यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.याप्रसंगी प्रस्ताविक तालुकाध्यक्ष डॉ प्रविण पाटील यांनी केले.नांदगाव तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचा पाढाच वाचला. याप्रसंगी मनोगतामध्ये रावसाहेब जाधव यांनी शिक्षक परिषदेच्या स्थापनेपासून आपसी बदली, अन्यायाविरुद्ध लढा,दिव्यांग न्याय लढा,निवड श्रेणी आंदोलन असे अनेक आंदोलने शिक्षक हितासाठी केले.कार्यवाह /सरचिटणीस विनायक बोरसे,पंकज सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलतांना राज्य सरचिटणीस/कार्यवाह संजय बबनराव पगार म्हणाले, की यांनी निवड श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव कसे तयार करावे . यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन,स्थायित्व प्रस्तावांबाबत जिल्हा परिषद स्तरावर कॅम्प लावून कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी भाग पाडणार आहोत, आपले वेतनश्रेणी जिल्हास्तरावर प्रलंबित असणारी प्रस्ताव निकाली काढण्यासाठी शिक्षक परिषद पाठपुरावा करणार असून आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना वेतन वाढ देण्यासाठी मेळावा घेऊन आंदोलन करणार आहे. डीसीपीएस धारक मयत शिक्षकांच्या वारसा कुटुंब निवृत्ती वेतन मिळवून देण्यासाठी व नांदगाव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देऊन तालुका स्तरावर तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून आंदोलन करणार. याप्रसंगी दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, जिल्हा प्रतिनिधी पुंडलिक शिंगाडे ,मानसिंग महाले व नाशिक सोसायटी संचालक अरविंद माळी उपस्थित होते.
नांदगाव तालुक्यात कार्यकारणीतील अध्यक्ष डॉ .प्रवीण पाटील, सरचिटणीस/कार्यवाह विनायक बोरसे, कार्यकारी अध्यक्ष निलेश शितोळे, कोषाध्यक्ष रमेश अहिरे तसेच विनोद घुगे ,नामदेव घुगे,भरत पवार, प्रशांत अहिरे,सचिन आव्हाड , नितीन भामरे, निलेश शिरोडे, चिंतामण सदगीर, समाधान नाईकवाडे, विलास सोनवणे,बापूसाहेब अहिरे,किशोर जवंजाळ,अतुल तायडे, DCPS प्रतिनिधी मंगेश अहिरे,सुकलाल महाजन, प्रविण ठाकरे, शैलेश टिळेकर, गौतम बोरसे, महिला आघाडी श्रीम.संगीता सोनवणे, श्रीम. ज्योती पाटील,श्रीम.वर्षा विसंदरे,कार्यकारिणी पदाधिकारी,केंद्र प्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल तायडे यांनी केले तर आभार चिंतामण सदगीर यांनी मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510