अवाजवी घरपट्टी वाढीतून नाशिककरांना मिळणार दिलासा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 8 जून 2024
β⇔नाशिक, दि.8 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांना लावलेल्या आवाजवी घरपट्टी मधून नाशिककरांना आता दिलासा मिळणार आहे .शिवसेना शिंदे गटा पाठोपाठ भाजप आमदार यययदेवयानी फरांदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. नंतर नगर विकास विभागाने महापालिका आयुक्तांना घरपट्टीचे पूर्ण निरीक्षण करून न्यायचित फेरबदलाचे आदेश दिले आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिल 2018 पासून शहरातील मिळकतीसह मोकळ्या भूखंडावर पाच ते सहा पट करवाड करत, नाशिक करांवर घरपट्टी वाढ लादली होती .कर सुधारणेखाली शहरातील इंच इंच जमिनीवर घरपट्टी लादण्याचा इतकेच नव्हे तर शेती क्षेत्रालाही घरपट्टी आकारणीचा अजब गजब निर्णय मुंडे यांनी घेतला होता. या आवाजवी करवाढी विरोधात जन आंदोलन उभे राहिले होते. एवढेच नव्हे तर त्या विरोधात नाशिककरांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
दरम्यान काही महिन्यापूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटाने या प्रकरणावर आवाज उठविल्या नंतर आवाजवी घरपट्टी वाढीचे निरीक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. परंतु दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक आणि त्या पाठोपाठ विधानसभेच्या आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने निर्णय होऊ शकला नव्हता. आता आमदार फरांदे यांनी या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले असून सदर करवाढ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नगर विकास विभाग मुख्यमंत्र्यांच्या अधिनस्त असल्याने या विभागाने महापालिका आयुक्तांना घरपट्टीचे पुनर्निरीक्षण करून न्यायचीत फेरबदल करण्याचे आदेश दिले आहेत .त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)