प्रा.डॉ. शंकर बोराडे यांचे अल्पशा आजाराने निधन, मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक, प्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक हरपला ,परिवारावर दु: खाचा डोंगर कोसळला
β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 26 नोव्हेंबर 2023
β⇔ नाशिक,ता. 26 (प्रतिनिधी : डॉ . भागवत महाले ) :- नाशिक येथील मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक, महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक, ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित झालेले प्रा. डॉ शंकर बोराडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या निधनाने नाशिक शहरासह जिल्ह्यत सहकारी मित्र व परिवारावर दुख कोसळले आहे . शंकरराव मागच्या वर्षी मविप्र संस्थेच्या कर्मवीर शांताराम बापू वावरे महाविद्यालय सिडको महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सिन्नर , पिंपळगाव या महाविद्यालयांमध्ये त्यांनी कामकाज केले होते. त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा आलेख जागृतिकार पाळेकरांच्या समग्र लेखनाचा चिकित्सक अभ्यास , या विषयावर संशोधन करुन साविञीबाई पुणे विद्यापीठाची Ph D पदवी प्राप्त केली होती.
पीएच. डी. गाईड म्हणून मार्गदर्शन करत असताना नऊ विद्यार्थी पीएच.डी त्याचबरोबर नेट-सेट पास झाले आहेत. त्यांची प्रकाशित पुस्तके मरणगाथा कवितासंग्रह,उजेडा आधिचा काळेख, समाजचिञे, कडा आणि कंगोरे, व्यक्तीचिञे, देशभक्त शेषराव घाटगे चरीञ, शोध डाॅ वसंतराव पवारांचा संपादन ,लोक परंपरांचे सिन्नर संपादन, विडीची गोष्ट हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध, विविध पुस्तकांचे सहलेखन केले ते दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते .
“वृत्तपञात तीस वर्षापासून लेखन ,स्तंभ लेखन करत होते. ग्र॔थ परिक्षणे – गेले लिहायचे राहूनी- विनायक पाटील, परतवारी – सुधीर महाबळ ह्या एका दुऐसाठी – मनोहर विभांडिक, ञिकोणातील वादळ पेलताना -लतिका चौधरी , जोकर बनला किंगमेकर – संजय वाघ , रंग जीवनाचे – बबन काकडे, मी बीडी – किसनलाल सारडा , अशा अनेक पुस्तकांची परीक्षणे प्रसिद्ध ,आकाशवाणीवर पन्नासहून अधिक भाषणे प्रकाशित शाळा , महाविद्यालयात विविध विषयांवर व्याख्याने ,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासञात निबंध वाचन व चर्चक म्हणून सहभाग , सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेत ग्रंथसचिव , सांस्कृतिक सचिव पदावर कार्यरत, साहित्य सावाना दिवाळी अंकाचे तीन वर्ष कार्यकारी संपादक , थिंक महाराष्ट्र डाॅट काॅम या वेब पोर्टलवर सद्या लेखन प्रसिध्द होत असते, शाळेत शिपाई , लेखनिक , माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा करून सद्या महाविद्यालयात प्राध्यापक , झाडू ते खडू , साहित्य संशोधन , लेखन असा प्रवास राष्ट्र सेवा दलाचे कामात सक्रीय सहभाग सेवानिवृत्तीनंतर सारांश प्रकाशन च्या माध्यमातून नाशिकमध्ये त्यांनी विविध नवोदित लेखकांचे लेखन प्रसिद्धीसाठी योगदान देत होते. अशा या ग्रंथ मित्राच्या आकस्मित निधनाने मराठा विद्या प्रसारक तसेच नाशिक सह महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.” डॉ.शंकर बोऱ्हाडे यांना भावपूर्ण आदरांजली व विनम्र अभिवादन– शोकसंवेदना- नारायण पाटील
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०