





जयरामभाई हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळ वार्षिक निवडणूक मतदान संपन्न

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया जाणून केले उत्साहात मतदान
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि. 18 जून 2024
β⇔नाशिकरोड, दि.18 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील जयरामभाई हायस्कूल मध्ये शालेय मंत्रिमंडळाची वार्षिक निवडणूक दि. १५ जुलै २०२४ रोजी घेण्यात आली. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी तसेच निवडणुकीतील आपला सहभाग किती महत्त्वाचा आहे हे समजण्यासाठी विद्यालयामध्ये सदर निवडणूक प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या शिक्षिका सौ. जे. एस. कपाटे व श्री ए.एम. लोखंडे यांनी सदर निवडणूक प्रक्रियेचे आयोजन केले. मतदान अधिकारी म्हणून श्री.एस. डी. कदम, श्री. एम. डी. पाटील व श्री टी. ए. खांडबहाले यांनी कामकाज बघितले. केंद्राध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक जे एन आहेर यांनी कामकाज बघितले. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बी. बी. साळवे यांनी सर्व मतदार व निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार यांना परिपूर्ण असे मार्गदर्शन करून संपूर्ण कार्यक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी केली.

. यावेळी बिटको महाविद्यालयातील संजय परमसागर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनीहीं विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. निवडणुकीपूर्वी प्रत्येक उमेदवाराला चिन्हांचे वाटप करण्यात आले आणि सर्व मतदारांपर्यंत स्वतःची माहिती पोहोचविणे व प्रचार करणे यासाठी पुरेसा वेळ उमेदवारांना देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी उमेदवारांना उस्फूर्तपणे मतदान केले.सदर निवडणूक प्रक्रियेचा निकाल पुढील दोन दिवसात जाहीर केला जाणार असून त्यानंतर जे मंत्रिमंडळ नियुक्ती होणार असून ते संपूर्ण वर्षभर विद्यालयामध्ये शिस्त, स्वच्छता,अभ्यास व क्रीडा या विभागांचे कामकाज बघणार आहे अशी माहिती मुख्याध्यापक जे. एन. आहेर यांनी दिली.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)