





बिटको महाविद्यालयात लाडक्या गणरायाची जल्लोषात स्थापना

β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : नाशिक : बुधवार : दि 20 सप्टेंबर 2023
β⇒ नाशिक , ता. 20 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे आज लाडक्या गणरायाची महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते पुजा विधी व आरती करुन स्थापना करण्यात आली . याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर , विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष प्रा. लक्ष्मण शेंडगे , विद्यार्थी कल्याण मंडळाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल माने , श्री. संजय परमसागर , राजू कनोजिया यासह विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते . महाविद्यालयीन गणेशोत्सव ५ दिवस साजरा करण्यात येणार असून याप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन व पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी दिली . या स्पर्धा उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पाठारे , उपप्राचार्या सुनिता नेमाडे , पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे , जयंत भाभे , आदिती तोष्णीवाल , नितीन पाटील यांच्या संयोजनाखाली होत आहेत .
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक :डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
