β: दिंडोरी :⇔दिंडोरी तालुक्यातील शिक्षक परिषदेचा बी.एल.ओ.कामावर बहिष्कार, प्रांत उपविभागीय अधिकारी शिंदे यांना निवेदन – ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव )
β: दिंडोरी :⇔दिंडोरी तालुक्यातील शिक्षक परिषदेचा बी.एल.ओ.कामावर बहिष्कार, प्रांत उपविभागीय अधिकारी शिंदे यांना निवेदन - ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव )
दिंडोरी तालुक्यातील शिक्षक परिषदेचा बी.एल.ओ.कामावर बहिष्कार, प्रांत उपविभागीय अधिकारी शिंदे यांना निवेदन
गाव पातळीवर शासकीय व निमशासकीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बी .एल.ओ चे काम करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतांना शिक्षकांना आदेश दिल्याने बहिष्कार
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :मंगळवार: दि. 2 जानेवारी 2024
β⇔दिंडोरी, ता. 2 ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ) :- जिल्हा परिषद शिक्षकांना नेहमीच कोणतेही काम शासनाचे पाचवीलाच पुजलेले असतात , त्यांना सर्वेक्षण , मतदान अधिकारी , जनगणना, मेळावे अशी प्रकारची कामे करावी लागतात . त्यामुळे त्याचा अध्यापन कार्यावर परिणाम होतो. ते शिक्षक सक्षमपणे अध्यापन करू शक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संस्थापक कोषाध्यक्ष संजय पगार यांचे नेतृत्वात दिंडोरी प्रांत.उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे साहेब यांना बी.एल.ओ.कामावर बहिष्काराचे निवेदन देऊन समक्ष चर्चा केली.
सदर निवेदनात नियमबाह्य देण्यात आलेले बी.एल.ओ.आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली.कोणत्याही गाव पातळीवरील शासकीय व निमशासकीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदेश देऊन सदरचे काम पुर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे स्पष्ट आदेश असताना देखील सदर आदेश जिल्हा परिषद शिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षक परिषदेने निवेदन देऊन सदर आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. यावेळी निवेदन देताना शिक्षक परिषद दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, यांच्या समवेत बी.एल.ओ.चे काम करण्याचे आदेश मिळालेले शिक्षक कैलास बांगर,अरुण रोडे(दिंडोरी),सुरेश भोये(घोडेवाडी), सुरेश सातपुते, रवींद्र भरसट,अनिल गाडे(वणी मुले), हिराबाई महाले,संजय बच्छाव, अरविंद विश्वास (वणी मुली), सुनील माळी (खेडगाव),खंडु बदादे(अहिवंतवाडी),शरद धादवड(संगमनेर मुळाणे),नंदु महाले(चामदरी), तुकाराम राऊत (ओझरखेड),दिलिप शिंदे, योगेश गाडे(विळवंडी),कैलास पवार (आंबानेर), सुभाष चौधरी (जांबुटके), आदि शिक्षकांना बी.एल.ओ.आदेश मिळालेले सर्वजण उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२0८१८0५१0