0
1
2
9
1
1
दुचाकी शिकणे बेतले जीवावर, महिलेचा मृत्यू
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 5 फेब्रुवारी 2024 β⇔ सिन्नर दि,5( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ) – शहरातील देवी रोड आयटीआय परिसरात दुचाकी शिकत असताना महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. राणी देवी सुरज सिंग (35) असे मृत महिलेचे नाव आहे.
राणी देवी ह्या आपल्या भावाची दुचाकी घेऊन देवी रोडला दुचाकी चालवायला शिकत होत्या.त्यांना ब्रेक लावण्याऐवजी रेस एवढ्या जोरात वाढवल्या गेली, की त्यांच्याकडून दुचाकी थेट एका खड्ड्यात जाऊन आदळली. त्यामुळे त्यांना त्यांच्या गुडघ्याला व पोटाला जबर मार लागला. त्यात त्यांचा उपचारा आधीच मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक आव्हाड हे करत आहेत.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510