β : येडशी :⇔येडशीत संगीत शिक्षण वर्गाचे उद्घाटन,मुलांमध्ये उत्साह-(प्रतिनिधी : सुभान शेख)
β : येडशी :⇔येडशीत संगीत शिक्षण वर्गाचे उद्घाटन,मुलांमध्ये उत्साह-(प्रतिनिधी : सुभान शेख)
येडशीत संगीत शिक्षण वर्गाचे उद्घाटन,मुलांमध्ये उत्साह
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि.9 एप्रिल 2024
β⇔येडशी– दि.9(प्रतिनिधी : सुभान शेख)- येडशी येथे मंगळवार रोजी गुढीपाडवा शुभ मुहूर्तावर सायंकाळी 6 :30 वाजता शास्त्रीय संगीत शिक्षण वर्गाचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला.यावेळी पालक व विद्यार्थी वर्गा बहुसंख्येने उपस्थीत होते .
यावेळी संगीत विशारद सुरेश वाघमारे यांच्या हस्ते संगीत वर्गाचे उद्घाटन करण्यात आले .संस्थेचे सचिव महादेव सस्ते, संगीत शिक्षक जावळे सर यांची प्रमुख उपस्थित होती. येडशीसह परिसरातील पालकांची गायन,वादन, नृत्य विषयाचे संगीत वर्ग उपलब्धतेसाठी येडशी येथील जालिंदर सस्ते (बप्पा ) मंडळाकडे मागणी केल्याने हे वर्ग सुरू केले. आसल्याचे मंडळाचे सचिव महादेव सस्ते गुरुजी यांनी आपले मनोगत प्रसंगी मत व्यक्त केले .
या संगीत वर्गात शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण देण्यात देण्यात येईल. मुलांचा संगीतामुळे मुलांचा बौद्धिक विकास होण्यास खूप फायदेशीर होते, असे आपल्या मनोगत व्यक्त सुरेश वाघमारे यानी मार्गदर्शन करतांना केले. याप्रसंगी मुलांसोबत वाघमारे सर यांनी गीत सादर करून उपस्थीतांची मने जिंकत मुलांना व मनोरंजनात्मक गीत सादर करत मुलांना केले. यावेळी
नंदिनी लोमटे, राधिका पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रास्ताविक प्रतिमा सस्ते यांनी केले.तर आभार अश्विनी पवार यांनी मानले.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510