β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 1 फेब्रुवारी 2024
β⇔,त्र्यंबकेश्वर , दि.1 (प्रतिनिधी: प्रा.समाधान गांगुर्डे ) :- त्र्यंबकेश्वर: येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,त्र्यंबकेश्वर येथे म.वि.प्र संस्थेच्या युवास्पंदन तालुकास्तरीय स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले.दोन दिवशीय वा स्पर्धामध्ये संगीत साहित्य,ललित,नाट्य,गायन इ. कलाप्रकाराच्या अंतर्गत २० प्रकारांचा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.त्यातील प्रामुख्याने भारतीय व पाश्चात्य गायन लोकनृत्य, वक्तृत्व, वादविवाद, पोस्टर डिझाइन, रांगोळी, फोटोग्राफी ,मेहंदी, एकांकीका इ. कला प्रकारांत विविध महाविद्यालयाच्या संघांनी आपल्या सहभाग नोंदविला.
या स्पर्धांमध्ये त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाने वरीष्ठ महाविद्यालय विभागात पाश्चात्य गायन, वक्तृत्व व वादविवाद मध्ये प्रथम क्रंमाक पटकाविला. तर कनिष्ठ विभागाने शास्रीय स्वर वादन, लोक वाद्य, शास्त्रीय नृत्य भारतीय व एकांकीका स्पर्धेत प्रथम क्रंमाक प्राप्त केला आहे.उर्वरित कला प्रकारांत गिरणारे, सातपूर महाविद्यालये यश संपादन केले.स्पर्धेच्या समारोप समारंभ प्रसंगी अध्यक्ष प्राचार्य डाॅ.दिलीप पवार हे होते तर ज्ञानेश्वर कर्पे (अंतर्गत परीक्षक) ,श्रीमती कांचन गोसावी व श्रीमती माधवी भोसले (बहि:स्थ परीक्षक) हे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दिलीप पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “कलाकारांना प्रेक्षकांसमोर कला सादर करताना धाडस लागते तसेच कला सादर करताना कलेचा प्रकार जाणून घेणे आवश्यक असते, कलेची थिम निवडताना नेहमी संस्कृती, सामाजिक,नैतिक मूल्यांचा विचार व्हावा, लोककलांचा मानवी जीवनाशी संबंध असून कलेमुळे मानवी जीवन व संस्कृती समृध्द होते.” असे मत व्यक्त केले.यावेळी परीक्षक ज्ञानेश्वर कर्पे व श्रीमती माधवी भोसले यांनीही विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारातील सादरीकरण करताना कोणती काळजी घ्यावी. या विषयी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. स्पर्धा समन्वयक म्हणून सांस्कृतिक समिती प्रमुख डाॅ.सुलक्षणा कोळी यांनी संयोजन केले.स्पर्धा यशस्वीतेसाठी सकाळ सत्रप्रमुख डॉ. राजेश झनकर,प्रो.डाॅ.संदीप निकम,प्रा.श्रीमती जोंधळे मॅडम,प्रा. संदीप गोसावी, डाॅ.भागवत महाले,प्रा.नीता पुणतांबेकर,प्रा.शाश्वती निरभवणे, प्रा.किरण शिंदे,डॉ.नयना पाटील,डाॅ. पोपट बिरारी,प्रा.प्रणील जगदाळे,प्रा.अर्चना धारराव,प्रा.विष्णु दिघे, प्रा.आशुतोष खाडे, प्रा.ममता धनगर, प्रा.उत्तम सांगळे, रवींद्र मालुंजकर व इतर सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:मो 8208180510
β : येडशी (धाराशिव ):⇔येडशी बसस्थानकात शौचालय सुविधा अभावी प्रवासी महिलांची गैरसोय” परिवहन मंत्री-प्रताप सरनाईक यांना निवेदन, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी:सुभान शेख)
2 weeks ago
β : दिंडोरी(नाशिक):⇔जऊळके वणी येथील रंगोत्सव सेलिब्रेशनच्या स्पर्धेत 13 विद्यार्थी ठरले इंटरनॅशनल स्पर्धेसाठी पात्र-(प्रतिनिधी: रावसाहेब जाधव)
2 weeks ago
β : दिंडोरी(नाशिक):⇔सोनजांब येथे वार्षिक गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रमास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-(प्रतिनिधी: रावसाहेब जाधव)
2 weeks ago
β : नाशिक :⇔’राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना सामाजिक नितीमूल्य व श्रम संस्काराची शिकवण मिळते’-हरिभक्त परायण प्रा. भगवान महाराज शिंदे-(प्रतिनिधी:शाश्वत महाले)
2 weeks ago
β : येडशी (धाराशिव ):⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज” चॅनल व यूट्यूब चैनल च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त “श्री गणेश ,बार्शी” यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा!( जाहिरात प्रतिनिधी: सुभान शेख,मो.9834516313)
2 weeks ago
β : येडशी (धाराशिव ):⇔”दिव्य भारत बीएसएम न्यूज” चॅनल व “यूट्यूब” चैनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त “मा.श्री. साशंक सस्ते आणि मा.श्री. सुनील पाटील, येडशी,” यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा!-(जाहिरात प्रतिनिधी: सुभान शेख,मो.9834516313)