β : सुरगाणा :⇔ चिकाडी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न – (प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
β : सुरगाणा :⇔ चिकाडी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न - (प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
चिकाडी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.14 डिसेंबर 2023
β⇔सुरगाणा,ता.14,(प्रतिनिधी : एकनाथ शिंदे ):–सुरगाणा तालुक्यातील चिकाडी येथे बुधवार दिनांक 13/12/2023रोजी केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सालभोये केंद्र अंतर्गत येणाऱ्या शाळा चिकाडी, पिळुकपाडा, सालभोये, पाथर्डी, मेणमाळ, पाराचापाडा, रोकड पाडा, पंगारबारी, भरडमाळ, माळेगाव, केळुणे, थविलपाडा या शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धा ह्या तीन प्रकारात घेण्यात आल्या. कला,क्रीडा, व सांस्कृतिक.यामध्ये 200मीटर धावणे मुले, आणि 100 मीटर धावणे मुली,चित्रकला स्पर्धा, बुद्धिबळ, वैयक्तिक गायन्स, स्पेलिंग बी, समूहगीत गायन, वैयक्तिक नृत्य,व सामूहिक नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात केंद्रप्रमुख एन .एस .जोपळे, चिकाडी गावचे सरपंच, सदू बागुल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, एकनाथ शिंदे, सदस्य मुरलीधर बागुल, चिकाडी शाळेचे मुख्याध्यापक बागुल सर , या मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वतीचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली.
सदर स्पर्धेत मुलांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रथम ,द्वितीय व तृतीय असे क्रमांक पटकावले. स्पर्धेचे निकाल वकृत्व स्पर्धा :प्रथम क्रमांक -ज्योती गणेश वाघमारे (जि.प. शाळा रोकडपाडा ), द्वितीय क्रमांक- हेमांगी भास्कर बागुल (जि.प. शाळा चिकाडी ), तृतीय क्रमांक- तन्वी भास्कर बागुल (जि.प. शाळा पिळूकपाडा ), चित्रकला स्पर्धा :-प्रथम क्रमांक- मनीष महेंद्रनाथ भोये (जि.प. शाळा सालभोये ), द्वितीय क्रमांक- कल्याणी अंबादास गवळी(जि. प शाळा रोकडपाडा ), तृतीय क्रमांक- हेमांगी भास्कर बागुल(जि.प. शाळा चिकाडी ), 200 मीटर धावणे ( मुले):- प्रथम क्रमांक मदन गोपाळ वाघ(शाळा मेणमाळ), द्वितीय क्रमांक – योगेश लक्ष्मण चौधरी(जि.प. शाळा पिळूकपाडा), तृतीय क्रमांक- अंकुश परसराम गाढवे(जि.प. शाळा भरडमाळ), 100 मीटर धावणे (मुली) :- प्रथम क्रमांक -भीमा नामदेव वाघमारे(जि.प. शाळा पिळूकपाडा), द्वितीय क्रमांक- भारती हरि कडाळी(जि.प. शाळा पंगारबारी ), तृतीय क्रमांक- गायत्री उत्तम गायकवाड(जि.प. शाळा चिकाडी). बुद्धिबळ स्पर्धा:- प्रथम क्रमांक- विजय नवनाथ गांगोडे(शाळा सालभोये), द्वितीय क्रमांक- केतन मधुकर बागुल(शाळा पिळूकपाडा), तृतीय क्रमांक- प्रतीक भास्कर कांमडी(शाळा रोकडपाडा). स्पेलिंग बी. :- प्रथम क्रमांक-केतन भास्कर बागुल(शाळा पिळूक पाडा), द्वितीय क्रमांक-दीक्षा यशवंत वासले (शाळा रोकडपाडा ), तृतीय क्रमांक -भूमिका रविंद्र भोये(शाळा सालभोये), वैयक्तिक गायन :प्रथम क्रमांक -अंकिता पंडित मिसाळ (शाळा रोकडपाडा), द्वितीय क्रमांक- हर्षली दीपक गावित (शाळा पिळूकपाडा), तृतीय क्रमांक- चेतना मनोहर पाडवी (शाळा चिकाडी), समूह गायन :- प्रथम क्रमांक- जिल्हा परिषद शाळा पिळूकपाडा, द्वितीय क्रमांक -जिल्हा परिषद शाळा रोकडपाडा, तृतीय क्रमांक -शाळा थवीलपाडा व चिकाडी, वैयक्तिक नृत्य :- प्रथम क्रमांक-अंकिता पंडित मिसाळ( शाळा रोकडपाडा), द्वितीय क्रमांक- पायल गोविंद भोये ( शाळा सालभोये ), तृतीय क्रमांक -सीमा नामदेव वाघमारे (शाळा पिळूकपाडा ), समूह नृत्य :- प्रथम क्रमांक -जिल्हा परिषद शाळा रोकडपाडा, द्वितीय क्रमांक- पिळूकपाडा, तृतीय क्रमांक- जिल्हा परिषद शाळा सालभोये आदीसह बहुसंख्येने सहभाग नोंदवला .
सदर स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले. स्पर्धकांचे एक ते तीन क्रमांक काढून बक्षीस देण्यात आले. यावेळी चिकाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.बागुल सर, श्री. थवील सर, सदू बागुल,भगवान पाडवी, मुरलीधर बागुल, काशिनाथ बागुल, परसराम गायकवाड, भास्कर बागुल, प्रकाश चौधरी, किसन बागुल, उत्तम गायकवाड, कांतीलाल हाडस, या शिक्षकांनी स्पर्धेचे व्यवस्थापन करून परिश्रम घेतले. यावेळी शाळेचे शिक्षक शिक्षिका, व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शाळेतील मुले व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश चव्हाण यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०