Breaking
ब्रेकिंग

  β⇒ बोरगाव : कळवण प्रकल्प  आश्रमशाळेत बसणार ‘फेस बाय मॅट्रिक्स’ प्रणाली- ( प्रतिनिधी  : लक्ष्मण बागुल ) 

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीची होणार ऑनलाइन नोंद- लक्ष्मण बागुल

0 1 2 9 1 1

कळवण प्रकल्प  आश्रमशाळेत बसणार ‘फेस बाय मॅट्रिक्स’ प्रणाली

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीची होणार ऑनलाइन नोंद

β⇒  दिव्य भारत बी एस एम न्यूज  –  प्रतिनिधी  – बोरगाव  : लक्ष्मण बागुल 
β⇒  बोरगाव , ता.१  ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा   ):- कळवण प्रकल्प अंतर्गत येणा-या 40 शासकीय आश्रमशाळेत ‘फेस बाय मॅट्रिक्स’ ही प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार आहे. म्हणून  विशिष्ट प्रकारचे कॅमेरे प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत बसवण्यात येणार आहे. याचबरोबर प्रकल्पअंतर्गत येणा-या कळवण, सुरगाणा, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव व चांदवड तालुक्यातील 39 अनुदानित आश्रमशाळेतही ‘फेस बाय मॅट्रिक्स’ ही प्रणाली बसवण्यात येणार आहे.
              शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यस्थळी राहत नसल्याची पालक व सामाजिक कार्यकर्त्याची याबाबत कायमच तक्रार होती. या प्रणालीमुळे प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आश्रमशाळेत कधी आला व गेला या माहितीची ऑनलाईन नोंद होणार आहे. प्रकल्पातील 29 शासकीय वसतिगृहात सुद्धा ‘फेस बाय मॅट्रिक्स’ कॅमेरा बसवण्यात येणार आहे. एका दिवसात 1000 फोटो काढण्याची या कॅमेराची क्षमता आहे. पुढील आठवड्यात कळवण प्रकल्प कार्यालयात याचा डेमो प्रत्येक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसमोर सादर करण्यात येणार आहे. बसविण्यात येणा-या प्रत्येक कॅमेराची लिंक कळवण प्रकल्प कार्यालयात जोडली जाणार आहे. प्रत्येक आश्रमशाळेत एक कॅमेरा बसवण्यात येणार आहे. या कॅमेऱ्याची किंमत 21 हजार रुपये इतकी आहे. सध्या जरी या प्रणालीद्वारे फक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या हजेरीची नोंद होणार असली, तरी कालांतराने प्रत्येक विद्यार्थ्यांची हजेरी याप्रणालीद्वारेच होणार आहे.
  
                             शिक्षक उपस्थिती, पर्याय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना कार्यस्थळी कायम हजर राहणे बंधनकारक आहे. तरीही अनेक कर्मचारी शहरातून ये – जा करत होते. यावर पर्याय म्हणून कळवण प्रकल्पातील आश्रमशाळेत सकाळी व रात्री आश्रमशाळेच्या आवारात फोटो काढून तो प्रकल्प कार्यालयास पाठवण्याचे नियोजन केले होते. त्यानंतर दुसरा पर्याय म्हणून  प्रत्येक आश्रमशाळांची वेळ सकाळी 8.45 ते सायंकाळी 4 अशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ‘फेस बाय मॅट्रिक्स’ ही प्रणाली वापरण्यात येणार आहे.

           अनेक गोष्टींना पायबंद  :
                      “कळवण प्रकल्प अंतर्गत सात तालुक्यात आश्रमशाळा आहेत. यात 42 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वेळेवर शिक्षक उपस्थित राहत नाही किंवा शिक्षक निवासी राहत नाही, अशा तक्रारी येत असल्याने ‘फेस बाय मॅट्रिक्स’ कॅमेरा बसवल्याने या गोष्टींना पायबंद बसणार आहे. शिक्षक निवासी राहिल्याने आरोग्य विषयक अडचणी आल्यास त्याची तत्काळ सोडवणूक होईल.”  विशाल नरवाडे, प्रकल्प अधिकारी, कळवण
  β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले ,मो ८२०८१०८०५१० 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!