





उंबरठाण महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा !
दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि . 5 ,सप्टेंबर 2023
β⇒उंबरठाण , ता .५ ( प्रतिनिधी – सुभाष पवार ) :- डांग सेवा मंडळ नाशिक संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय उंबरठाण येथे इंग्रजी विभागाच्या वतीने ”शिक्षक दिन “ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ.एकनाथ आहेर होते. या दिवसाचे औचित्ये साधून विद्यार्थ्यांनी सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा लेखणी (पेन) व फुलपुष्प देऊन संन्मान केला. शिक्षक हा युगप्रवर्तक असून तो विविध कलागुणांनी, वैशिष्ट्यांनी व उत्तम विद्यार्थ्याचा जन्मदाता अशा वर्णनातून सर्व प्राध्यापकांनी मनोगते व्यक्त केली.
प्रा.डॉ.एकनाथ आहेर म्हटले की, एक चांगला शिक्षकच सर्वोत्तम विद्यार्थ्याची घडवणूक करू शकतो हे जगतविख्यात आहे. विद्यार्थी व शिक्षक हे पवित्र नाते कायम सोनेरी पानावर लखलखीत राहावे, हीच नवशिक्षक, युवकाना शुभेच्छा! या शिक्षक दिनी विद्यार्थी प्राचार्य रुपाली गुंबाडे, शिक्षकपदी प्रमिला भोये, महेंद्र भोये, भावना चौधरी, दीपिका बागुल, अलिशा भोये, ज्योती धूम, दुर्गा गांगोडे, शीतल बागुल, मीनाक्षी चौधरी, ग्रंथपाल मनोज गांगुर्डे, शिपाई विशाल कणसे इ. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पदाचा पदभार स्वीकारून उत्तमपणे जबाबदारी पार पाडली. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्याने कौतुक केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ.एकनाथ आहेर, स्टाफ सेक्रेटरी प्रा.एस.के.पवार प्रा.अनिता कोळी प्रा.उमा देशमुख प्रा.किशोर काळे प्रा.मधुकर गावित ,प्रा.कलावती थवील ,प्रा.हेमलता महाले प्रा.ज्योती येवले, प्रा.पूनम सूर्यवंशी ,प्रा.मंदीप राऊत ,श्री.अनिल कदम, श्री. बागुल ,श्री.यशवंत राऊत, आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन प्रा.अनिता कोळी यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी ज्योती धूम हिने केले. आभारप्रदर्शन विद्यार्थिनी अलिशा भोये हिने मानले.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले, मो . ८२०८१८०५१०
