





संदीप फाउंडेशन फार्मसी महाविद्यालयात फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह साजरा !
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. २५ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिक (महिरावनी) ता.२५ ( प्रतिनिधी :डॉ. कमलेश दंडगव्हाळ ):- येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयात दि. 17 ते 23 सप्टेंबर दरम्यान फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाची थिम “फार्माकोव्हिजिलन्समध्ये सार्वजनिक आत्मविश्वास वाढवणे” अशी होती. महाविद्यालयातील विद्यार्थांनी महिरवनी गावात रॅली काढून जनजागृती केली. विद्यार्थांनी महिरवनी येथे घरोघरी जाऊन प्रतिकूल औषध प्रतिक्रिया यावर प्रबोधन करून माहिती संकलित केली. ह्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थाना भारताचा फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम (PvPI) हा एक फ्लॅगशिप ड्रग सेफ्टी मॉनिटरिंग प्रोग्राम आहे . जो सामान्यतः विविध Adverse Drug Reaction Monitoring Centre (AMCs) द्वारे प्राप्त होणाऱ्या औषध-संबंधित प्रतिकूल घटना एकत्रित करतो आणि त्याचे विश्लेषण करतो. औषधांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवून आणि त्याद्वारे औषधांच्या वापराशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी भागधारकांना संवेदनशील करून भारतीय लोकसंख्येमध्ये रुग्णांची सुरक्षा आणि कल्याण सुधारणे हे PVPI चे ध्येय आहे. हेल्थकेअरमध्ये फार्माकोव्हिजिलन्स महत्त्वाची भूमिका बजावते, कारण ते औषधांचे प्रतिकूल परिणाम ओळखण्यास, मूल्यांकन करण्यास आणि प्रतिबंधित करण्यात मदत करते. याबद्दल माहिती देण्यात आली.
या प्रसंगी घोषणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत ४०हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण साप्ताहिक कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरिता प्रा. अक्षदा काळे, प्रा. शंकर येलमामे तसेच इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
