β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार: दि. १९ ऑक्टोबर २०२३
β⇔ नाशिकरोड ,ता.19 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :-” भावी पिढी भरकटू नये यासाठी भाषिक कौशल्य वाढीस लागावे परस्पर संवाद वाढवल्यास भाषिक अभिवृत्ती होऊ शकते. आयुष्याची दिशा , ध्येय धोरणे ठरवा त्या दृष्टीने मार्गक्रमण करा,” असे ज्येष्ठ साहित्यिक व कवी शंकर बोऱ्हाडे यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात मराठी विभागावतीने आयोजित मराठी वाडमय मंडळाचे उद्घाटन करताना प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी मराठी विषयातील शैक्षणिक व रोजगार संधीबाबत माहिती दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी, विज्ञान विभाग समन्वयक डॉ के. सी. टकले ,उपप्राचार्य डॉ अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर , मराठी विभागप्रमुख डॉ. के.एम. लोखंडे , डॉ. संतोष पगार पआदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कु. नंदिनी जाधव आणि गणेश कसबे यांनी स्वरचित कविता सादर केली. डॉ के एम. लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.शरद नागरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. डॉ. उत्तम करमाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, प्रा. राजेश बागुल यांनी संयोजन केले तर आभार डॉ. आरती गायकवाड यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संभाजी शिंदे , प्रा. वृषाली उगले , उषा पाटील , सुचिता पुंडलिक यासह मराठी विभागातील शिक्षकांनी व विद्यार्थी यांनी केले .
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो .८२८०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)