β : पुणे :⇔शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालयात ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : विपुल धसाडे)
β : पुणे :⇔शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालयात 'जागतिक योग दिन' उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : विपुल धसाडे)
शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालयात ‘जागतिक योग दिन‘ उत्साहात साजरा
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 25 जून 2024
β⇔पुणे, दि. 25 (प्रतिनिधी : विपुल धसाडे) :-मानवी जीवनात शारीरिक, मानसिक , शैक्षणिक स्तरावर योगाने विकास घडवून आणता येईल आणि प्रत्येकाने नित्यनियमाने योगासने, प्राणायाम, ध्यान यांचे महत्त्व समजावून घेऊन आपले शरीर स्वास्थ्य राखणे अत्यावश्यक आहे, असे आव्हान पुणे येथील श्रीयोग संस्थेच्या योगप्रशिक्षिका सौ.कमल ननावरे यांनी 10 व्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रतिपादन केले.
त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ खराडी येथील शंकरराव उरसळ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयांमध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्रॅम अंतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. सोशल मीडियाच्या आभासी जगात राहत असताना सर्व वयोगटातल्या विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि विशेषतः मानसिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी योगासने व प्राणायाम करून अधिक एकाग्रतेने सक्षम बनणे अत्यावश्यक आहे असे त्यांनी बोलतांना सांगितले. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांनी प्रास्ताविक केले आणि जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात दैनंदिन जीवनातील ताण – तणावापासून मुक्ती आणि सकारात्मक सुदृढ जीवनशैली अंगीकारण्यासाठी सर्वांना प्राणायाम व योगासनाचे प्रात्यक्षिक योगप्रशिक्षिका सौ. स्वाती रासकर यांनी दिले. या यावेळी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन कोतवाल, उपप्राचार्या डॉ.विजया बर्गे, पदविका विभाग प्रमुख डॉ. सुजित काकडे, वरिष्ठ शिक्षक डॉ. रवींद्र पाटील, राष्ट्रीय सेवा योजना प्रोग्रॅम अधिकारी प्रा.भाग्यश्री शेलार, प्रा. नितीन नेहरकर यांच्यासह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी योगासने करून उत्साह पूर्वक सहभाग घेतला. या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रा तृषा शंग्रपवार यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)