





सराईत गुन्हेगारा विरोधात स्थानबद्धतेची कारवाई–पोलीस आयुक्त : संदीप कर्णिक

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.9 एप्रिल 2024
β⇔सिन्नर,(नाशिक) दि.9(प्रतिनिधी : सुरेश इंगळे):– उपनगर, नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत माजाविणाऱ्या सराईत गुन्हेगारा विरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जय उर्फ माऱ्या उर्फ मारुती वाल्मीक घोरपडे ( 21) रा. विहितगाव, नाशिक रोड) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
सराईत गुन्हेगार जय यांच्या विरोधात नाशिक रोड, उपनगर पोलीस ठाण्यात धारदार शास्त्राचा धाक दाखवून दहशत माजविणे ,जबर दुखापत, जबरी चोरी, खरफोडी, प्राणघातक हल्ला, महिलांची छेडछाड, अपहरण, मनाई आदेशाचे उल्लंघन यासारखे 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ,पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात आणखी काही सराईत गुन्हेगारा विरोधात कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510