चेहडी येथे पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर मातीने चिखल; वाहतुकीस अडथळा, त्वरित कामे करण्याची मागणी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 21 एप्रिल 2024
β⇔चेहडी(नाशिक), दि.21 (प्रतिनिधी : पांडुरंग गुरव):- चेहडी शिव प्रभाग क्रमांक 19 येथे गेल्या आठ दिवसापासून पाईपलाईन फुटलेली असून रस्त्याची कामे चालू आहेत.सदर रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गुरव, परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चेहडी शिव प्रभाग क्रमांक 19 हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून नागरिक ,विद्यार्थी ,ज्येष्ठ नागरिक नोकरदार याच मार्गाचा नेहमी वापर करतात. त्यामुळे नागरिकास प्रवास करतांना अडथळा निर्माण होत आहे. चेहडी शिव प्रभाग क्रमांक 19 येथे गेल्या आठ दिवसापासून पाईपलाईन फुटलेली असून अर्धवट कामे सुरु आहेत. अनेक वेळा संबंधित अधिकारी व कर्मचार्यांशी बोलून देखील रस्त्याची कामे अदयाप पूर्ण झाली नाहीत. वाहतुकीस त्रास होत असल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गुरव व नागरिकांनी त्वरित काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )