





नवभारत साक्षरता अभियान जिल्हाभरात बहिष्कार कायम
प्रशासनाला चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचा कुठलाही अधिकार नाही–संजय पगार

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.18 मार्च 2024
β⇔दिंडोरी ( नाशिक)दि. 18 ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):- नवभारत साक्षरता अभियान अशैक्षणिक कामांविरोधात सर्व शिक्षक संघटनांनी नाशिक जिल्ह्यात बहिष्कार टाकला आहे. याप्रसंगी बहिष्कार टाकतांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग राज्य सरचिटणीस/कार्यवाह संजय पगार यांनी सांगितले, की अनेक गटांत गटशिक्षणाधिकारी हे नवभारत काम न करणाऱ्या शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल करण्यासंदर्भात उल्लेख करत आहेत. मात्र संघटनात्मक पातळीवर कर्मचाऱ्यांनी विरोधात भूमिका घेताच अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याचा अधिकार कोणत्याही अधिकाऱ्यांस नाही. जर संबंधितांची गुन्हे दाखल केले तर संघटना अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे. मुळात या प्रकारची गुन्हे दाखल करण्याचा अधिकार कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांस नाही, असे संजय बबनराव पगार राज्य सरचिटणीस महाराष्ट्र शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील रविवार दिनांक 17/03/2024 रोजी होणारी NILP नवभारत साक्षरता कार्यक्रम परिक्षेसंदर्भात होणारी तालुकास्तरीय मुख्याध्यापक सहविचार सभा सर्व शिक्षक संघटनांनी उधळून लावली आणि सर्व निफाड गटातील शिक्षक संघटनांच्या प्रमुखांनी सदर NILP च्या बहिष्कारावर ठाम असल्याचे सांगितले, सदरच्या बहिष्कारासाठी दिंडोरी,निफाड व सर्वच गटातील सर्व शिक्षक संघटना एकजूट झालेल्या या ठिकाणी पहावयास मिळाल्या.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रा.वि.चे राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार यांनी सांगितले की, नवभारत साक्षरता कार्यक्रम हा पूर्णतः अशैक्षणिक कार्यक्रम असून सदर कार्यक्रम 2027 सालापर्यंत चालणार आहे. त्यामुळे इतकी वर्षे शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवणे हे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अयोग्य असून आमची संघटना या अन्याया विरुद्ध पूर्ण ताकदीने सर्व शिक्षकांच्या पाठिशी आहोत. एकही शिक्षक कार्यक्रमात सहभागी होणार नाही व परिक्षा व इतर कामांत सहभागी घेणार नाही. सर्व शिक्षकांनी एकजुटीने सदर कार्यक्रमाच्या बहिष्कारावर ठाम राहावे व सदर आंदोलनास साथ द्यावी. जे शिक्षक साथ देतील त्यांच्यावर कोणताही प्रकारची कारवाई जिल्ह्यात सर्व शिक्षक संघटना होऊ देणार नाही आणि सदर आंदोलनास जे शिक्षक सहभागी होणार नाहीत. त्या शिक्षकांना सर्व संघटनाच्या रोषाला सामोरे जावे लागेल यासाठी शासनाने त्रयस्थ यंत्रणा उभारावी असे संजय पगार यांनी सांगितले.तसेच दिंडोरी व निफाड गटाचा आदर्श इतर गटांनी घ्यावा व सर्वांनी एकजुटीने सदर नवभारत साक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार घालावा. नाशिक जिल्हा भरातील शिक्षकांनी बहिष्कारात सहभागी होणे असे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार या बहिष्कार सर्व शिक्षक सहभागी झाले व जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सदरील परीक्षा झाल्या नाही.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०