β : नाशिक :⇔’याची देही याची डोळा’ संत निवृत्ती महाराज पालखी रिंगण सोहळा-(प्रतिनिधी :सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔'याची देही याची डोळा' संत निवृत्ती महाराज पालखी रिंगण सोहळा-(प्रतिनिधी :सुरेश इंगळे)
‘याची देही याची डोळा’ संत निवृत्ती महाराज पालखी रिंगण सोहळा
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 26 जून 2024
β⇔नाशिक, दि.26 (प्रतिनिधी :सुरेश इंगळे):-आज सकाळी सिन्नर वासियांचा अल्पोपहार व दुपारी कुंदेवाडीकरांच्या आमरस पुरणपोळीचा आस्वाद घेत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी हजारो वारकऱ्यांसह दातली येथे आगमन होताच दातलीकरांनी पालखीवर पुष्प वर्षाव आणि फटाक्याची आतिश बाजी केली. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी दातलीच्या वेशीवर आल्यानंतर भजनी मंडळांनी टाळ मृदंगाच्या गजरात रिंगण सोहळ्याच्या ठिकाणापर्यंत पालखीचे वाजत गाजत स्वागत करत रिंगण सोहळा मैदानावर दाखल झाली.
यावेळी जिल्हाभरातून हजारो भाविकांनी सोहळा बघण्यासाठी तुफान गर्दी केली होती. भाविकांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला रिंगण सोहळ्यासाठी चार एकर जागेत हा भव्य दिव्य रिंगण सोहळा पार पडला. यावेळी दातली करा कडून रिंगण मैदानावर भव्य रांगोळी व फुलांचा सडा टाकून रिंगण सोहळ्याचे स्वागत केले. रिंगण सोहळा सुरू झाल्यानंतर वायू वेगाने अश्वमेघ धावण्यास सुरुवात झाली. यावेळी भक्ती सागरात बुडालेल्या वारकऱ्यांनी रिंगणामध्ये धाव घेत फेरा पूर्ण केला. यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय मान्यवर यांनी रिंगण सोहळ्याला भेट देत पालखीचे दर्शन घेतले. यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशन कडूनही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. सिन्नर एमआयडीसी व वावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस सेवक, होमगार्ड, तसेच जिल्हा मुख्यालय यांच्याकडूनही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)