येडशी येथे चोरांचा सुळसुळाट, पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 29 ऑगस्ट 2024
β⇔ येडशी, 29 (प्रतिनिधी : सुभान शेख ) :- धाराशिव तालुक्यातील येडशी गावची वीस हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. हा येडशी गाव धाराशिव ग्रामिण पोलिस ठाणे च्या अंतर्गत आहे. या धाराशिव ग्रामिण पोलिस ठाणे चे पोलिस निरीक्षक – मारुती शेळके हे कार्यरत आहेत. तसेच, मारुती शेळके हे दररोज रात्री – अपरात्री पोलिस प्रशासनाची पेट्रोलींग ची गाडी फिरवून आपली ड्युटी बजावतात. परंतु, धाराशिव जिल्ह्यावर या अगोदर पोलिस अधीक्षक-अतुल कुलकर्णी हे कार्यरत होते. या पोलिस अधीक्षक-अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापुर ग्रामीण येथे बदली करण्यात आली. पोलिस अधीक्षक-अतुल कुलकर्णी यांची बदली झाल्यानंतर नुतन पोलिस अधीक्षक- संजय जाधव हे कार्यरत आहेत. नुतन पोलिस अधीक्षक-संजय जाधव यांनी ड्युटी वर येऊन, पंधरा दिवस झाले आहेत, पदभार स्वीकारुन, तरी , या येडशी गावात चोऱांचा मोठ्या प्रमाणात चोरांचा सुळसुळाट होत आहे. तरी आणि आज येडशी मध्ये गजानन नलावडे यांची सोनेगाव – भानसगाव असलेले खडी क्रेशर आहे. या खडी क्रेशर वर रात्री-अपरात्री कोणीही नसल्याने, चोरांनी फायदा उचलून दि.27 ऑगस्ट रोजी रात्री-अपरात्री चोरांनी फायदा उचलून, गजानन नलावडे यांच्या खडी क्रेशर वर बाजुला असलेलें दोन खोल्या समोरील बसविलेले सी.सी. कॅमेरे, एल.एडी टिव्ही, थ्री फेज वायर, युनिव्हिटर, खोल्यातील भांडी अज्ञात चोरांनी चोरुन नेले आहे. तसेच, येडशी मध्ये या अगोदरही पवनराजे मल्टिस्टेटच्या पाठिमागे येऊन गेले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. आज या येडशी गावा मध्ये ग्रामस्थांनात दहशतीचे वातावरण पसरले आहे, तरी धाराशिव नुतन पोलिस अधीक्षक-संजय जाधव यांनी लवकरात – लवकर दखल घेऊन, लक्ष केंद्रित करून, धाराशिव ग्रामिण पोलिस ठाणे यांच्या कडे पोलिस प्रशासन वाढवून, आदेश काढण्यात यावे. तसेच, धाराशिव ग्रामिण पोलिस ठाणे यांच्या कडे रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करण्यासाठी अनेक गावे आहेत, रात्रीच्या वेळेस पोलिस प्रशासन कमी पडत आहेत. धाराशिव ग्रामिण पोलिस ठाणे चे पोलिस निरीक्षक मारुती शेळके यांनी येडशी येथे औट पोस्ट पोलिस ठाणे मध्ये पोलिस प्रशासन वाढविण्यात यावे. व येडशी मध्ये रात्री-अपरात्री चोऱ्या होत असलेले थांबवून, चोरांचे मुसक्या आवळून आळा घालण्यात यावे. अशी मागणी ग्रामस्थांनातुन होत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा