देशी पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे हस्तगत, सिन्नर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 6 मार्च 2024
β⇔सिन्नर, दि.6(प्रतिनिधी:सुरेश इंगळे ):-– सिन्नर शहरातील हॉटेल शाहू नजीक बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या युवकास गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैद्य धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे निहाय कारवाया करण्यात येत आहेत.
त्या अंतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखोलकर यांना सिन्नर शहरांमध्ये अवैधरित्या घातक अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या तरुणाबाबत गुप्त माहिती मिळाली असता त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हॉटेल शाहू परिसरात वरिष्ठाच्या सूचनेप्रमाणे सापळा रचून गणेश लक्ष्मण हाके 26 राहणार गोजरे मळा सिन्नर यास ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली. सदर शस्त्र तो कोणाला विकणार होता याबाबतची माहिती त्यांच्याकडून अद्याप मिळाली नसून त्याच्याविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे राजू सुर्वे ,हवालदार चेतन संवस्तकर, प्रवीण सानप, हेमंत गरुड, पोलीस शिपाई विनोद टिळे, गणेश बागुल, हेमंत गिलबिले, प्रदीप भैरव यांचे पथक करत आहेत.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510