“सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ अंतर्गत सात बालकांवर शस्त्रक्रिया !”
⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : बोरगाव प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल
⇒बोरगाव, ११ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- राष्ट्रीय बाल स्वास्थ आरोग्य कार्यक्रमांतर्गत सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात ७ बालकांवर तपासणीनंतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने हर्निया, हायड्रोसिल व फायमोसिस अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नाशिकचे प्रख्यात बाल शल्यचिकित्सक डॉ. प्रविण गडसिंग, डॉ. प्रविण बोरा, अधिपरिचारिक चंद्रकांत भोये यांनी प्रयत्न केले.
सुरगाणा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ .संजय चौधरी यांनी भूलतज्ञ म्हणून काम पाहिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. अनंत पवार, दीपक चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले. शिबिरासाठी डॉ. प्रविण पवार, डॉ. श्रीकांत कोल्हे, डॉ. माधूरी गावित, डॉ. योगिता जोपळे, डॉ. दीपिका महाले, डॉ. सुनयना पवार यांनी परिश्रम घेतले. सुरगाणा सारख्या आदिवासी दुर्गम भागात यासारख्या सोयी – सुविधा रुग्णालयात मिळत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले ,मो . ८२०८१८०५१०