Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

शोकाकूल वातावरणात ज्ञानयोगी सर डॉ. मो.स. गोसावींना श्रद्धांजली

शोकाकूल वातावरणात ज्ञानयोगी सर डॉ. मो.स. गोसावींना श्रद्धांजली

0 0 2 5 6 3

शोकाकूल वातावरणात ज्ञानयोगी सर डॉ. मो.स. गोसावींना श्रद्धांजली

  दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा  : नाशिक  प्रतिनिधी   : प्रा . छाया  लोखंडे  

नाशिक , ता .१० ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा  ):- शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभाप्रमाणे कार्य करणाऱ्या व आपल्या कार्यातून सर्व समाजासमोर आदर्श असणाऱ्या सर डॉ. मो. स. गोसावी ह्यांना ९ जुलै रोजी देवाज्ञा झाली. त्यांना गोखले एज्युकेशन सोसायटी तर्फे दि. ११ जुलै रोजी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. संस्थेच्या’गुरुदक्षिणा’ सभागृहात आयोजित  श्रद्धांजली सभेत व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रिं एस. बी. पंडित , संस्थेच्या एच. आर. डायरेक्टर प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे , पालक मंत्री माननीय दादासाहेब भुसे, आमदार देवयानी फरांदे ,आमदार सौ. सीमाताई हिरे, विभागीय सचिव , प्राचार्य राम कुलकर्णी , संस्थेच्या उपाध्यक्षा प्राचार्या डॉ. सुहासिनी संत , प्राचार्य व्ही. एन. सूयवंशी विश्वस्त डॉ. आर. पी. देशपांडे, देणगीदार श्री अतुल चांडक , ‘श्री जयंतराव कुलकर्णी,अक्षय देशपांडे, श्री. सुहास शेठ क्षत्रिय विक्रम कपाडिया उपस्थित होते. त्यांचे पुत्र व संस्थेचे आस्थापना संचालक श्री शैलेश गोसावी, श्री कल्पेश गोसावी , प्रकल्प संचालक व सरांचे जावई श्री प्रदीप देशपांडे , व गोसावी व देशपांडे परिवाराचे सदस्य , समाजातील मान्यवर, संस्थेचे सर्व अध्यापक, कर्मचारी; सरांचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

                             सभेचे प्रास्ताविक संस्थेचे नाशिक विभागाचे सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी हयांनी केले. त्यांनी सरांच्या शैक्षणिक योगदानाचे महत्व व्यक्त केले. गोसावी सरांनी केलेल्या संस्कारांचे महत्व व्यक्त केले. नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय दादासाहेब भुसे ह्यांनी ही आपल्या भावना व्यक्त केले. ते म्हणाले ह्या संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांचे जीवन घडले आहे . अनेक नवे , मोठे उपक्रम त्यांनी संस्थेच्या माध्यमातून हाती घेतले. आमदार सौ. देवयानी फरांदे ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या सरांनी ह्या संस्थेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिक्षण संस्थेचे संचालक कसे असावे ह्याचा वस्तुपाठ घालून दिला .  सौ. सीमाताई हीरे ह्यांनी नेतृत्व , कर्तृत्व व दातृत्व तीन ही क्षेत्रातील सरांचे मोठेपण व्यक्त केले.
केंद्रीय समन्वय समितीचे शाळा विभागचे समन्वयक श्री विनोद देशपांडे, बी. वाय. के. महाविद्यालयाचे प्राचार्य व ब्रँच सेक्रेटरी प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी ह्यांनी सरांच्या आठवणी सांगताना सर शिक्षकांमध्ये संशोधन वृती रुजवण्यासाठी प्रोत्साहन देत होते व विद्यार्थ्याना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याची संधी मिळावी ह्या साठी प्रयत्न केले ते सांगितले.  मुक्त  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे ह्यांनी सरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. पालघर महाविद्यालयाचे प्राचार्य व शाखा अधिकारी श्री मेश्राम ह्यांनी सरांनी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार केला त्या आठवणी सांगितल्या. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने बी. वाय. के. महविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री गिरीश नातू ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्थेच्या देणगीदारांच्या वतीने श्री अतुल चांडक, माजी प्राचार्यांच्या वतीने प्राचार्य के. आर. शिंपी हयांनी भावना व्यक्त केल्या. अॅड. जयंत जायभावे ‘ श्री लक्ष्मीकांत जोशी ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केले. श्री जोशी ह्यांनी गोसावी सरांच्या व्यक्तीमत्वाचा अध्यात्माच्या व्यासंगाचा पैलू उलगडून दाखविला. प्रा. दिलीप फडके ह्यांनी सरांचा विद्यार्थी म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे  अध्यक्ष श्री नितीनदादा ठाकरे ह्यांनी आपल्या मनोगतात सरांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडून दाखविले.

            संस्थेच्या उपाध्यक्षा प्राचार्या डॉ. सुहासिनी संत म्हणाल्या की सर अध्यात्माची बैठक असलेले ज्ञान तपस्ची होते. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्याचे वर्णन केले. विश्वस्त प्राचार्य डॉ.आर पी देशपांडे ह्यांनी सरांच्या निधनाने आलेली पोरकेपणाची भावना व्यक्त केली. एच. एस .सी .व एस. एस. सी. बोर्डाचे श्री मच्छिंद्र कदम ह्यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या.  संस्थेच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. सौ दीप्ती देशपांडे ह्यांनी संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने व गोसावी – देशपांडे परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पित केली. त्या म्हणाल्या की सरांची नाळ ही शिक्षणाशी जुळली होती. १९५८ साली त्यांनी घेतलेली प्राचार्यपदाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केली. संस्थापक प्रिं टी . ए कुलकर्णी ह्यांनी लावलेल्या बीजाचे वटवृक्षात रूपांतर गोसावी सरांनी केले असे त्या म्हणाल्या. सरांची उर्वरित कामे संपूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. सरांची कन्या ह्या नात्याने ही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .  संस्थेचे अध्यक्ष प्रिं एस. बी. पंडित ह्यांच्या श्रद्धांजलीने ह्या सभेचा समारोप झाला. त्यांनी सरांबरोबर ६५ वर्षे एक मताने काम करताना आलेले अनुभव स्पष्ट केले. त्यांनी गोसावी सरांच्या बरोबर संस्थेच्या विविध प्रकल्पांची उभारणी कशी केली त्या बद्दल आठवणी सांगितल्या. या शोकसभेला विविध क्षेत्रातील मान्यवर ,सरांचे विद्यार्थी, उद्योजक , देणगीदार संस्थेच्या तीनही विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . शोक सभेचे समापन विद्यार्थ्यानी केलेल्या गीतेच्या १५ व्या अध्ययनाच्या पठनाने झाले.

   दिव्य भारत बी. एस. एम .न्यूज  : मुख्य संपादक   : डॉ .भागवत महाले .मो .८२०८१८०५१०   
शोकाकूल वातावरणात ज्ञानयोगी सर डॉ. मो.स. गोसावींना श्रद्धांजली

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!