त्र्यंबकेश्वर महाविद्यालयास रासेयो जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार- डॉ. संदिप माळी यांना प्रदान
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी : अर्चना धारराव
β⇒ त्र्यंबकेश्वर , ता ५ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला आणि उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार महाविद्यालयातील डॉ. संदिप माळी यांना प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, रासेयो संचालक डॉ.सदानंद भोसले, डॉ. शिवनकर, डॉ. मंठाळकर यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सन २०१८-१९, २०१९-२०,२०२०-२१ या तीन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी आपली पूर्ण क्षमता पणाला लावून अतिशय कौतुकास्पद, चिरकाल टिकेल असे आणि समाजाला नवी दिशा देणारे असे काम केले, त्याची पावती म्हणून हा पुरस्कार प्रदान झाला.
सदर कालावधीतील मा. प्राचार्य व्ही. एस. काळे प्राचार्य डॉ.वेदश्री थिगळे, प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. गोरक्षनाथ पिंगळे, प्रा. मनोज वायदंडे, प्रा. मनोज मगर, डॉ. छाया शिंदे, डॉ. नयना पाटील, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक सहकारी कार्यालयीन व शिक्षकेतर सेवक यांनी दिलेल्या प्रोत्साहनाची व सहकार्याची आणि स्वयंसेवकांच्या मेहनतीची, सेवा कार्याची तसेच कुटुंबियांच्या पाठिंब्याची पुरस्कारार्थी डॉ. संदीप माळी यांनी आवर्जून आठवण केली व ऋण व्यक्त केले. या पुरस्कार वितरण प्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे संचालक श्री. रमेश पिंगळे, श्री. बाळू काकड, महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर ढोके, पुरस्कारार्थी डॉ. संदिप माळी, डॉ. शरद कांबळे, डॉ.राजेश झनकर, प्रा.उत्तम सांगळे, डॉ. नयना पाटील, सौ. वंदना माळी, श्लोक माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
मविप्रचे सरचिटणीस अड. नितीन ठाकरे, सभापती श्री. बाळासाहेब क्षीरसागर,अध्यक्ष सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.नितीन जाधव यांनी पुरस्काराबद्दल महाविद्यालय आणि कार्यक्रम अधिकारी यांचे अभिनंदन केले , महाविद्यालयाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०