





“मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनाबाबत अफवावर विश्वास ठेवू नये;जुन्या बँक अकाउंटवरच या योजनेचा लाभ मिळणार : नाशिक जिल्हाधिकारी –जलज शर्मा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 5 जुलै 2024
β⇔नाशिक,दि.5 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):– नाशिक – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये राज्यात “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली. या योजनेच्या घोषणेनंतर महिलांनी बँक आणि सेतू तहसील कार्यालयात गर्दी केली आहे. ही योजना आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळूक सुरू केली आहे. मात्र या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रावरून अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. तसेच ऑनलाईन संकेतस्थळावर योजनेची माहिती भरण्यासाठी पर्याय येत नसल्याने लाभार्थी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कार्यालयीन स्तरावर या योजनेच्या कागदपत्रावरून गोंधळ उडत असून विविध अफवाही पसरवल्या जात आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची अफवा देखील पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन बँक खाते उघडण्याची गरज नसून बँकेत कुठलेही डिपॉझिट भरू नये, असे आव्हान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केले आहे. तसेच सर्व बँकांना आणि सेतू केंद्राच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी सेतू केंद्रावर शासकीय अधिकारी नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. योजने संदर्भात कोणीही पैसे देऊ नये . शासकीय अधिकारी किंवा एजंट यांना कुठल्याही प्रकारे पैसे देऊ नये. त्यांनी पैसे मागितल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश नाशिक जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.
दरम्यान महिलांना जुन्या बँक अकाउंटवरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या जुन्या खात्याच्या पुस्तकाचे झेरॉक्स द्यावे लागणार आहेत. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे देणे, अर्ज भरून या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास, किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यावर व एजंट यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)