





भारत आदिवासी पार्टी पालघर जिल्हयात सहा विधानसभा लढविणार, तीन जागांवर शिक्कामोर्तब

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 07 ऑक्टोबर 2024
β⇔ पालघर, ता.07 ( प्रतिनिधी : गुहे मोहन ):- दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी मस्तान नाका येथे भारत आदिवासी पार्टी आणि अन्य समविचारी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आली. या सभेत जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचे ठरले असून, तीन जागांवर उमेदवारांची निश्चिती करण्यात आली आहे. उर्वरित तीन जागांसाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय सचिव गुहे मोहन जानकीबाई बारकु, जिल्हा अध्यक्ष संजय रघुनाथ घाटाल आणि इतर सहकारी पक्ष व संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी या सभेला उपस्थित होते. बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शिवविलास सोनकांबळे देखील या बैठकीत सहभागी होते. त्यांनी सांगितले की सहाही जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरले आहे, आणि अजूनही काही समविचारी पक्ष व संघटना एकत्र येऊन निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी सहकार्य करतील.
भिवंडी ग्रामीण, शहापूर, ठाणे, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणांहून अनेक तरुण समाज घटक बांधवांनी भारत आदिवासी पार्टीत सहभागी होण्यासाठी संपर्क साधला आहे. त्यांनी राखीव जागांवर उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लवकरच या सर्वांची भेट घेऊन पुढील रणनीती निश्चित करण्यात येईल.
सभा उत्साही वातावरणात पार पडली आणि जय आदिवासी, जय भीम, जय संविधान, जय जोहार, जय सहकार यांचा नारा देत उपस्थितांनी एकतेचा संदेश दिला.

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )