





येडशी ग्रामस्थांनाचे माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 24 जून 2024
β⇔येडशी, दि.24 (प्रतिनिधी : सुभान शेख) :-धाराशिव तालुक्यातील येडशी ग्रामस्थांनाच्या प्रश्नी दि.23 जुन 2024 रविवार रोजी माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना धाराशिव येथे सर्किट हाऊसवर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष – नितीन काळे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले असे की, धाराशिव तालुक्यातील येडशी येथे नवीन बॉडगेज रेल्वे स्टेशन ते जुने रेल्वे स्टेशन जोडण्यात यावे. सध्याचे नवीन रेल्वे टेशन हे येडशी गावापासून बऱ्याच अंतरावर असल्या कारणाने प्रवाशांना अत्यंत अडचणीचे ठरत आहे. नवीन रेल्वे स्टेशन दत्त मंदिर ते जुने रेल्वे स्टेशन हा मार्ग रस्ता जोडल्यास गावकऱ्यांना व येडशी बस स्थानक वरील प्रवाशांना रेल्वेने जाण्यासाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे. सध्या दत्त मंदिरापर्यंत रस्ता असून येथून जुने रेल्वे स्टेशनपर्यंत नॅरोगेजचा जुना मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे रेल्वेला कुठलीही जागा संपादित करावी लागणार नाही आणि तो रस्ता डांबरीकरण व पक्का केल्यास येडशीहुन रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग होऊ शकतो.
प्रबंधक – मध्य रेल्वे विभागीय कार्यालय सोलापूर यांच्याकडे या अगोदरही दि.21नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. तरी आणखी दुसरे वेळेस निवेदन देण्यात आलेल्या माजी रेल्वे मंत्री – रावसाहेब दानवे यांनी या प्रश्नाकडे लवकरात – लवकर दखल घेऊन नवीन बॉडगेज “रेल्वे स्टेशन ते जुने रेल्वे स्टेशन ” रस्ता जोडण्यात यावा. अशी मागणी रेल्वे मंत्री यांच्या कडे निवेदन द्वारे येडशी ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनावर स्वाक्षऱ्या असणाऱ्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे – सौदागर पंढरीनाथ मोहिते, योगेश पंडितराव कुलकर्णी, वामनराव भिमराव नलावडे, बाबुराव निवृत्ती तवले, आर.डी.कोळगे, महादेव लक्ष्मण कांबळे, सुरेश सोनवणे, वसंत मुरलीधर तौर, बाजीराव गोपाळराव गव्हार इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष – संताजी चाणुक्य, माजी जिल्हा अध्यक्ष – नितीन काळे, गजानन नलावडे, योगेश कुलकर्णी आदि सर्व उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)