महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक जिल्हाध्यक्षपदी रमेश गोहिल तर सरचिटणीसपदी रावसाहेब जाधव यांची निवड
β : नाशिक :⇔महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक जिल्हाध्यक्षपदी रमेश गोहिल तर सरचिटणीसपदी रावसाहेब जाधव यांची निवड-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 14 ऑक्टोबर 2024
β⇔ नाशिक: ता.14 ( प्रतिनिधी: डॉ . भागवत महाले):-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा राज्य मेळावा अक्षदा लॉन्स, नाशिक येथे उत्साहात पार पडला. या अधिवेशनात राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यवाह संजय पगार, कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर, राजेंद्र नांद्रे, बाबुराव गाडेकर, बाबुराव पवार, मंगेश जैवाल आणि दत्ता पाटील यांच्या उपस्थितीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मेळाव्यात निवड श्रेणी, जुनी पेन्शन योजना, पेसा वेतनश्रेणी, मुख्याध्यापक पदावरील १०० टक्के नियुक्ती आणि व्हाट्सअप बंदी या विषयांवर ठराव मंजूर करण्यात आले. प्रास्ताविक भाषण संजय पगार यांनी केले, तर सर्व जिल्हाध्यक्षांनी आपली मनोगते व्यक्त केली. राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी परिषदेला मार्गदर्शन करत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राष्ट्रहित, समाजहित, विद्यार्थी हित आणि शिक्षक हित जोपासणारी संघटना असल्याचे सांगितले. त्यांनी संजय पगार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील निवड श्रेणी शिक्षकांसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ते महाराष्ट्रभर आदर्श म्हणून मांडले. या मेळाव्यात नाशिक जिल्ह्यासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. रमेश रघुनाथ गोहिल यांची जिल्हाध्यक्षपदी, तर रावसाहेब बहिरू जाधव यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. याशिवाय, जिल्हा कोषाध्यक्षपदी सुनील अहिरे, कार्याध्यक्षपदी सुरेंद्र शेवाळे यांचीही निवड करण्यात आली. कार्यक्रमात इतर महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली, त्यात राजेंद्र खैरनार (विभागीय कोषाध्यक्ष), संजीवनी जगताप (विभागीय महिला आघाडी प्रमुख), सुभाष बर्डे (दिंडोरी तालुका अध्यक्ष), आणि अनेक इतर पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.
β : नाशिक :⇔महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक जिल्हाध्यक्षपदी रमेश गोहिल तर सरचिटणीसपदी रावसाहेब जाधव यांची निवड-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
नाशिक जिल्ह्यात शिक्षक परिषदेच्या नव्या कार्यकारिणीची निवड
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाचा राज्य मेळावा नाशिक येथील अक्षदा लॉन्स येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील विविध पदांसाठी निवड करण्यात आली. या मेळाव्यात राज्य उपाध्यक्षपदी दीपक खैरनार, विभागीय अध्यक्षपदी वासुदेव बोरसे, विभागीय कोषाध्यक्षपदी राजेंद्र खैरनार, विभागीय उपाध्यक्षपदी सुनील ठाकरे, विभागीय सहकार्यवाहपदी सचिन गुंजाळ, तसेच विभागीय महिला आघाडी प्रमुखपदी संजीवनी जगताप यांची निवड करण्यात आली. नाशिक जिल्हा कार्यकारिणीत रमेश रघुनाथ गोहिल यांची जिल्हाध्यक्षपदी, रावसाहेब बहिरू जाधव यांची सरचिटणीसपदी, सुनील अहिरे यांची कोषाध्यक्षपदी, तर सुरेंद्र शेवाळे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय, मनोज कुमार सोनवणे, रवींद्र ह्याळीज, जितेंद्र खोर, उत्कर्ष कोंडावार, मिलिंद धिवरे यांच्याही निवडी झाल्या आहेत.
उर्दू माध्यम प्रतिनिधी: कुरेशी सोहैल अहमद, मुजिर्बुहमान
या मेळाव्यात तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली. येवला तालुक्यात सुनील सुभानराव गोविंद तालुका नेते म्हणून निवड झाले, तर कार्याध्यक्षपदी उदयकुमार कुराडे, प्रतिनिधी रमेश धनवटे आणि बाबासाहेब ठाकरे यांची निवड झाली. बागलाण तालुका अध्यक्षपदी संजय पंडितराव पाटील आणि कार्यवाहपदी भीमराव जाधव यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमात अरविंद माळी, संदीप पाटील, वैभव उपासनी, संतोष शार्दुल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.या अधिवेशनात शिक्षक परिषदेसोबत असलेल्या विविध पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सोनवणे आणि उत्कर्ष कोंडावार यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)