Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

β : त्र्यंबकेश्वर :⇔ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यशाळांचे उद्घाटन संपन्न – (प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे)

β : त्र्यंबकेश्वर :⇔ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यशाळांचे उद्घाटन संपन्न - (प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे)

0 0 2 3 9 9

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वरयेथे विविध कार्यशाळांचे उद्घाटन संपन्न 

β : त्र्यंबकेश्वर :⇔ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्रंबकेश्वर येथे विविध कार्यशाळांचे उद्घाटन संपन्न - (प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे)
β : त्र्यंबकेश्वर :⇔ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यशाळांचे उद्घाटन संपन्न – (प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 13 फेब्रुवारी 2024

β⇔ त्र्यंबकेश्वर, दि.13 (प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे):- त्र्यंबकेश्वर येथील म.वि.प्र. समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे विविध कार्यशाळांचे उद्घाटन संपन्न झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळा अंतर्गत तीन दिवसीय विविध कार्यशाळांचे उद्घाटन करण्यात आले.

         यामध्ये प्रामुख्याने निर्भय कन्या अभियान, आदिवासी पारंपारिक लोककला स्पर्धा, नियतकालिक कार्यशाळा, यांचे उद्घाटन म.वि.प्र. संस्थेचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे साहेब यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना “निर्भय कन्या अभियान कार्यशाळा,आदिवासी लोककला स्पर्धा, नियतकालिक या सर्व कार्यशाळांमधुन विद्यार्थी व विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकास होईल. स्वसंरक्षणाच्या धडयातून मुलींचा आत्मविश्वास वाढेल, लोककलेतून स्वतःला अभिव्यक्त होता येईल, तर नियतकालिक लेखन कसे करावे हे तंत्र समजेल त्यामुळे या कार्यशाळा मौलिक ठरतील” असे प्रतिपादन संचालक रमेश पिंगळे यांनी केले.”                                                                                                                                        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून “माणूस म्हणुन जीवन जगताना होणाऱ्या शारीरिक, मानसिक त्रास समाजातील विकृती, यांच्याशी सामना करण्यासाठी निर्भय कन्या अभियान बळ देणारं ठरेल. लोककला या मुक्तता, उत्स्फूर्तता आणि लवचिकता धारण करणाऱ्या असुन मानवाच्या नित्य जगण्याची, धर्म विधीशी संबंधित असतात. त्यामुळे त्यांचे जतन व्हायला हवे. नियतकालिक ग्रंथ लेखनाचे कसब जाणून घेतल्यास विद्यार्थी दशेतच विविध प्रकारांतील लेखक व्यासंग व अभिव्यक्तीला मोठा पैसा प्राप्त होतो.

                 या तिन्ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या ठरतील” असे मत डॉ.दिलीप पवार यांनी व्यक्त केले.” तीन दिवसीय या विविध कार्यशाळांसाठी अनेक तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यात प्रामुख्याने डॉ. उज्वला निकम-स्त्रियांचे आरोग्य आणि काळजी, डॉ. चारुशीला खैरनार- महिलांचे हक्क व अधिकार, श्रीमती शितल सानप- कराटे प्रशिक्षण व संरक्षण तसेच नियतकालिक कार्यशाळा अंतर्गत डॉ.दिलीप धोंडगे- नियतकालिक तंत्र व मंत्र, डॉ. पी.आर. भाबड- नियतकालिकांचे अंतरंग,  प्रवीण जोंधळे-नियतकालिक मांडणी व मुद्रण , संदीप गांगुर्डे – आदिवासी लोककला यांचे वरील विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शास्वती निर्भवणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. मनोहर जोपळे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. निता पुणतांबेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!